शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

देवेंद्र म्हणती येतो, तात्याबाळे म्हणती पळतो

By admin | Published: February 26, 2015 2:12 AM

अगं बाबो, काय करावं या परधानाला ना त्येला आवतन, ना बिवतन पन सोताच कसा म्हंतो, येऊ का, येऊ का? नगं बाबा येवू तू

हेमंत कुलकर्णी, नाशिकबया बया माझ्या गावी, आज परधान आलापरधान कशी म्हणू, राजा तोच रयतेला।।अशा डौलडांगोऱ्यात, त्येची झाली गावफेरीअसा दादला देरे द्येवा, मनी म्हणतात पोरी।।-कुसुमाग्रजअगं बाबो, काय करावं या परधानाला ना त्येला आवतन, ना बिवतन पन सोताच कसा म्हंतो, येऊ का, येऊ का?नगं बाबा येवू तू ,पाहत्यात ना शरदबाबू -कुसुमाग्रजांची स्वयंघोषित बाळे शुक्रवारी कविश्रेष्ठ कुसमाग्रजांचा जन्मदिन, म्हणूनच राजभाषा दिन आणि म्हणूनच यंदा जनस्थान साहित्य पुरस्कार वितरण दिन. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अनिवासी नाशिककर अध्यक्ष (ही परंपरा अखंडित सुरू आहे़) मधु मंगेश कर्णिक यांच्या हातांनी अरुण साधू यांना जनस्थानाची बाहुली द्यायची आणि कार्यक्रम उरकून घ्यायचा, हा तूर्तास प्रतिष्ठानात मांड ठोकून बसलेल्या आणि कुसुमाग्रजांशी वा त्यांच्या साहित्याशी दूरान्वयानेही संबंध न आलेल्या वा त्यांनीच तो कटाक्षाने येऊ न दिलेल्या कारभाऱ्यांचा मानस. तात्यांनी स्वत:च जनस्थान आणि गोदावरी गौरव या दोन आडसाली पुरस्कार योजना आखून दिलेल्या असल्याने व कुसुमाग्रज स्मारकात संध्याकालीन शीत हवा खाण्याची सोय अबाधित राखायची असल्याने पुरस्कारांचे लोढणे ओढत राहण्याखेरीज कारभाऱ्यांना गत्यंतर नाही. त्यामुळं पटापटा आवरून मोकळे होऊन घ्या, हा त्यांचा व्यावहारिक विचार. पण कसचं काय, यंदा मोठी गडबडच झाली. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून डायरेक्ट फोन. कार्यक्रम कोणत्या वेळी आहे, (सायंकाळी सहा म्हणजे सहानंतर कधीही) शीएमसाहेबांना यायचं आहे, जरा वेळ अ‍ॅडजस्ट करता येईल तर बघा. साऱ्या कारभाऱ्यांचे हात कपाळाला. ह्ये काय आता नवंच! अशी काही परंपरा नाय! आम्ही गावभर निमंत्रणं पाठवली, तसं एक मंत्रालयातही पाठवलं. परवाच्या शनिवारी शीएम नाशकात आले, तेव्हा काही लुभ्य्रांनी मधी तोंड घातलं म्हणून टाकणं टाकल्यागत एक पत्र देऊन टाकलं. एरव्ही नाही का, एखाद्यानं येऊ नये असं वाटत असतं, त्याला ऐन वक्ताला आवतन द्यायचं म्हंजे तो यायला नको आणि आपल्यावर बोल नको, तसंच काहीसं. आता आपण टाकलेलं टाकणं हा गडी इतकं मनाला लावून घेईल याची काय कल्पना हो? तिकडं मंत्रालयातही असंच काहीसं झालं असणार. सांस्कृतिक कार्यक्रमांना हल्ली विनोद तावडे भसाभसा जात असतात, तेव्हां मुख्यमंत्र्यांनीही अधूनमधून गेलं पाहिजे, असा सल्ला कोणीतरी दिला असणार. त्यातून तात्यासाहेब ठाऊक नसले तरी उगाच त्यांचं नाव कुणी घेतलं की दोन्ही हातांनी कानाच्या पाळ्या पकडायच्या. मागे मनोहरराव जोशी नाही, वीस वेळा येऊन गेल्यानंतर एकविसाव्या वेळी आल्यावर योगायोगानं तात्यांना भेटले, पण जाहीर भाषणात म्हणाले, नाशकात येऊन तात्यांचं दर्शन घेतल्याखेरीज नाशकातून पायच बाहेर निघत नाही! सांगायचा मुद्दा फडणवीसांना कुणीतरी भरीस घातलं. मुख्यमंत्री वा कोणीही तत्सम व्यक्ती पायी चालली तरी फटके खाणार आणि घोड्यावरून चालली तरी फटके खाणार. तात्यांच्या कार्यक्रमाला फडणवीस आले नाहीत? हेच का त्यांचे साहित्यप्रेम आणि हाच का त्यांना मराठीचा अभिमान? नकोच ते. नाशकात जाऊनच येऊ. यजमान मात्र कपाळाला हात लावून बसलेले. पाव्हण्याला कसं सांगावं, की बाबा, नको भलत्या फंदात पडू. त्यांचे हात कपाळाला असतानाच ज्यांची बैठक टिळक भवनात आणि उठबैस बारामतीत असते असे एक साहित्यप्रेमी राजकारणी (अस्तंगत होत चाललेली जमात नाही?) तिथे अवतरले. म्हणाले, अरे येड्यांनो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे रयतेचा राजा, तो स्वत:हून येतो म्हणतो आहे ना, मग नाट का लावता? ‘पण पत्रिका तर छापून आणि वाटूनही झाल्या’, एक कारभारी कळवळला. उठबैसवाल्याने सांगितले, नव्या छापा, नव्याने वाटा, नाही तर राहू द्या, लोकाना कळेलच की. पण आता नाट नको. इतके झाल्यावर बहुधा सारे रडतराऊ घोड्यावर स्वार झाले. कुसुमाग्रजांनी ‘राजा आला’ ही कविता प्रसवली, तेव्हां पंतप्रधान राजीव गांधी यांचा झालेला नाशिक दौरा त्यांच्या नजरेसमोर होता, असे म्हणतात. या कवितेचा एकूणच भाव (एकूण कडवी १७) तसा गोड नव्हे, तो कडवटच. पण कवितेच्या बाहेरील आणि विशेषत: पुरस्कार वितरण समारंभांच्या आयोजनामागील मुख्य प्रेरक तात्यासाहेब शिरवाडकर वेगळेच होते. प्रतिष्ठानचा असा प्रत्येक कार्यक्रम जुन्या जमान्यातील पाचअंकी संगीत नाटकांसारखा ऐसपैस तर असलाच पाहिजे़ पण तो चित्तचक्षुचमत्कारिकही असला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असे. त्यापायीच की काय कोण जाणे, कार्यक्रमात एखादा व्हीव्हीआयपी असावा़ त्याच्या मागेपुढे कार्बाइनधारींचे कोंडाळे असावे, याची त्यांना आवड होती. त्यामुळे कार्यक्रमाला भारदस्तपणा येतो, अशी काहीतरी त्यांची भावना असावी. मतलब, मुख्यमंत्री आपणहून येत आहेत म्हटल्यावर त्यांनी जातीने लक्ष घालून प्रत्येक व्यवस्थेच्या चोखपणाची खातरजमा करून घेतली असती. पण आपली बाळं आपल्यासारखी कर्तबगार निघत नाहीत, हे साऱ्याच बापांच शल्य असतं, तेव्हां त्याला तात्यांचा तरी अपवाद का असावा?