शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

शिवमंदिरांत भक्तांची मांदियाळी, राज्यभरात उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 2:16 AM

महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी राज्यभरातील विविध शिवमंदिरांत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, कुणकेश्वर या प्रसिद्ध शिवमंदिरांत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी राज्यभरातील विविध शिवमंदिरांत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, कुणकेश्वर या प्रसिद्ध शिवमंदिरांत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी सप्तधान्य पूजा, पालखी दर्शन सोहळ्याला भाविकांची मांदियाळी होती. राज्याच्या विविध भागासह गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू , आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून भक्त आले होते.परळी (जि.बीड) येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठीही मंगळवारी देशभरातून लाखो आले होते. सोमवारी मध्यरात्री १२पासून दर्शनासाठी झालेली गर्दी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कायम होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनीही वैद्यनाथाचे दर्शन घेतले.तसेच वेरुळ (जि. औरंगाबाद) येथील श्री घृष्णेश्वरांच्या दर्शनालाही सोमवारी मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी झाली होती. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पहाटे श्री घृष्णेश्वरांचे दर्शन घेतले. देवगड तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) श्री कुणकेश्वर यात्रेस मंगळवारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. विधिवत पारंपरिक पूजेनंतर मुंबईच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव, रेखा भोईर यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हजारो भाविकांनी कुणकेश्वरांचे दर्शन घेतले. यावर्षी यात्रा तीन दिवस चालणार आहे.भीमाशंकर (जि. पुणे) येथेही पहाटेच्या दर्शनासाठी सोमवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यरात्री १२ वाजता देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते, आदींनी श्रींची पूजा केली.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री