शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

माऊलींच्या समाधीवरील महापूजाबंदीला भाविकांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 8:05 PM

दैनंदिन अभिषेकाव्यतिरिक्त भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय

ठळक मुद्देभाविक व पुजाऱ्यांचे जिल्हा न्यायाधीशांना लेखी निवेदन; देवस्थान निर्णयावर ठाम महापूजेदरम्यान भाविकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी  अभिषेकावेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची संजीवन समाधीच्या स्पर्शदर्शनासाठी गैरसोय

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या समाधीवर २७ डिसेंबर २०१९ पासून कमिटीच्या वतीने दैनंदिन होणाऱ्या पवमान अभिषेकाव्यतिरिक्त भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीने घेतला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात साडेचारशेहून अधिक भाविक तसेच पुजाºयांनी लेखी आक्षेप घेतला आहे. याविरोधात त्यांनी जिल्हा न्यायाधीश व विधी व न्यायमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. त्यामुळे पुढील निर्णय काय होईल; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ज्ञानेश्वरमहाराजांची समाधी ही संजीवन असून, ती समाजाच्या चिरंतन श्रद्धेचा ठेवा असल्याने तिचे संवर्धन व जपणूक होणे हे सर्व भाविकांचे सार्वत्रिक व सामूहिक उत्तरदायित्व आहे. त्यामुळे समाधीची होणारी झीज तसेच  अभिषेकावेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची संजीवन समाधीच्या स्पर्शदर्शनासाठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले.  माऊलींची संजीवन समाधी ही चिरंतन राहणे आवश्यक असल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने होणाऱ्या अभिषेकांमुळे समाधीची झीज होत आहे का, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व त्यांचा अहवाल मागविण्यासाठी संस्थानने भारत सरकारचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीने प्रत्यक्ष मंदिरामध्ये येऊन संजीवन समाधीची पाहणी केली होती. समाधीवर होणाऱ्या अभिषेक व महापूजांमुळे समाधीची अधिक झीज होऊ शकते व त्यामुळे समाधीवरील दैनंदिन अभिषेकांची संख्या कमीतकमी राखली जावी असा अभिप्राय व निष्कर्ष तज्ज्ञांनी संस्थान कमिटीकडे सादर केला होता.  त्यानुसार माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांच्याकडे कमिटीच्या विश्वस्तांनी सर्व विषय कथन करून घेतला होता. सदर विषयाचे सर्व पैलू जाणून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संजीवन समाधीवरील महापूजा व अभिषेक नियंत्रित करण्याबाबत अनुकूलता दर्शविली. त्यामुळे भाविकांकडून होणारे सर्व अभिषेक व महापूजा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीने घेऊन मुक्ताबाई मंडपात पर्यायी व्यवस्था कार्यान्वित केली आहे.   या निर्णयाला विरोध असेल, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात तक्रार व सूचना करण्यास देवस्थानने मुदत दिली होती. सद्यस्थितीत या निर्णयाविरोधात साडेचारशेहून अधिक भाविक तसेच पुजाऱ्यांनी लेखी आक्षेप घेतलेला आहे....................... माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी तसेच अभिषेक व महापूजा करण्यासाठी भाविकांची संख्या वाढत आहे. त्यातच महापूजेदरम्यान भाविकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. यापार्श्वभूमीवर नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू आहे. या निर्णयाचे भाविक, वारकरी व स्थानिक नागरिकांनी स्वागत करून अभिप्राय नोंदवला आहे. तर अनेकांनी दूरध्वनीवर संपर्क साधून निर्णयाचे स्वागत केले आहे. ............ चलपादुकांवर महापूजा व अभिषेक सुरू केल्यापासून तुलनात्मक पाहणी केली असता सकाळी सहा ते अकरा या वेळेत सरासरी ७८०० ते ८००० भाविकांचे दर्शन होत आहे. यापूर्वी तीच संख्या ३६०० ते ३७०० एवढी होती. त्यामुळे हा निर्णय चांगला असल्याचे अनेकांनी अभिप्राय दिला आहे. याबाबतचा तपशील संस्थान कमिटीकडून माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना सादर केला आहे  - अ‍ॅड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर