"अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दिवशीच दुपारी १.३६ वाजता..."; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:40 IST2026-02-25T12:06:03+5:302026-02-25T12:40:16+5:30

२८ तारखेला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रातील जनतेने, माध्यमांनी हा प्रश्न लावून धरला म्हणून मंगळवारी अहवाल दिला. मात्र या अहवालातही VSR कंपनीला वाचवण्याचा मार्ग ठेवला असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

DGCA tries to give clean chit to VSR company, Rohit Pawar allegations over Ajit Pawar plane crash | "अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दिवशीच दुपारी १.३६ वाजता..."; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप

"अजित पवारांच्या विमान अपघाताच्या दिवशीच दुपारी १.३६ वाजता..."; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप

मुंबई - २८ जानेवारी महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी काळा दिवस होता. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला त्याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. DGCA कडून मंगळवारी एक अहवाल आला. त्यात VSR कंपनीतील त्रुटी समोर आल्यानंतर DGCA ने या कंपनीची लिअरजेट विमाने उड्डाण करण्यास बंदी आणली. मात्र त्या अहवालातही या कंपनीला वाचवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला. VSR कंपनी चूक असेल तर DGCA चीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. VSR कंपनीच्या मालकाला अटक केली पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

विधान भवनात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, अपघाताच्या दिवशी २८ जानेवारीला DGCA ला एक अहवाल देण्यात आला होता. जेव्हा अजितदादांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये होता. अख्खा महाराष्ट्र शोकाकुल होता तेव्हा दुपारी १.३६ मिनिटांनी हा अहवाल दिला. त्यात VSR कंपनीला क्लीन चीट देण्याचा पहिला प्रयत्न झाला. लेव्हल १ बाबत कुठेही काही अडचण आम्हाला जाणवली नाही असं अहवालात म्हटलं होते. त्याशिवाय आम्ही ज्या मंत्र्‍यांचा राजीनामा मागतोय त्याच मंत्र्‍यांनी अपघाताच्या दिवशी कंपनीला क्लीनचीट देण्याचं विधान केले असा आरोप त्यांनी केला. 

अजित पवारांच्या विमान अपघाताने जुन्नरच्या आठवणी ताज्या! ६३ वर्षांपूर्वी झालेला भीषण विमान अपघात, ९४ जण होते...

तर आता मंगळवारी जो अहवाल आला त्यात काही प्रमाणात म्हणजे नखाएवढाच दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. व्हीएसआर कंपनीच्या अनेक त्रुटी ऑडिट टीमला जाणवून आल्या. विमान उड्डाणाच्या प्रमाणपत्रात त्रुटी आढळल्या. एअर सेफ्टी आणि फ्लाईट ऑपरेशनमध्येही त्रुटी दिसून आल्या. आम्ही पत्रकार परिषद घेऊन जो विषय मांडला. तेच VSR कंपनीच्या अहवालात दिसले. VSR कंपनीच्या कारभारात अनेक त्रुटी होत्या आता तुम्ही बोलता, पण या महाराष्ट्राचा एक मोठा नेता गेला. २८ तारखेला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रातील जनतेने, माध्यमांनी हा प्रश्न लावून धरला म्हणून मंगळवारी अहवाल दिला. मात्र या अहवालातही VSR कंपनीला वाचवण्याचा मार्ग ठेवला. VSR कंपनीतील ज्या त्रुटी आणि समस्या दिसून आल्या त्यातून लिअरजेटच्या विमानाचे उड्डाण थांबवण्याचे आदेश दिले. विमानातील त्रुटी दूर करण्याचं काम करा त्यानंतर पुन्हा सुरू करण्यास अप्रत्यक्षपणे अहवालात सांगितले. केवळ दिखावा म्हणून हा अहवाल आणला गेला. लिअरजेटबाबत तुम्ही त्रुटी सांगता, इतर विमानांचे काय? VSR कंपनीची सगळीच विमाने ग्राऊंड करायला हवीत. टीडीपीचे जे खासदार आहेत, जे देशाचे नागरी वाहतूक मंत्री आहेत त्यांच्या नेत्याचे आणि VSR कंपनीचे मालक यांच्यात आर्थिक संबंध आहेत असा आरोपही रोहित पवारांनी केला आहे. 

दरम्यान, VSR कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले पाहिजे. DGCA च्या अधिकाऱ्यांनी ज्याकडे याकडे दुर्लक्ष केले त्यांचीही चौकशी केली पाहिजे. मी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जाऊन DGCA विरोधात जे VSR कंपनीशी जवळ आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे. यामागे घातपाताचा विषय आहे त्यामुळे अज्ञातावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. दादांचा अपघात की घातपात याच्या खोलात आम्ही जाणारच आहोत. लोकांसमोर हे सत्य आले पाहिजे. हे सत्य बाहेर आणण्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत. यासाठी जो जबाबदार असेल त्याला शोधण्याचं काम आम्ही करणार आहोत. येणाऱ्या लोकसभा अधिवेशनात खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडावा. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा विषय घ्यावा. आज आमचा FIR घेतला नाही तर उद्या बारामतीत लोकांसोबत जाऊन पोलीस ठाण्याबाहेर बसू. जोपर्यंत FIR होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे. 

Web Title : रोहित पवार का आरोप, अजित पवार के विमान हादसे में साजिश, जांच की मांग।

Web Summary : रोहित पवार ने अजित पवार के विमान हादसे में लीपापोती का आरोप लगाया, वीएसआर कंपनी और डीजीसीए की भूमिका की जांच की मांग की। उन्होंने गड़बड़ी की आशंका जताई और गिरफ्तारी की मांग की, एफआईआर दर्ज नहीं होने पर विरोध प्रदर्शन की धमकी दी।

Web Title : Rohit Pawar alleges conspiracy in Ajit Pawar's plane incident, demands investigation.

Web Summary : Rohit Pawar alleges a cover-up in Ajit Pawar's plane incident, demanding investigation into VSR company and DGCA's role. He suspects foul play and calls for arrests, threatening protests if FIR isn't filed.