शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

पोलीस महासंचालकांनी अखेर बदल्यांचे आदेश फिरविले

By admin | Published: June 09, 2016 5:43 AM

पोलीस निरीक्षकांच्या मुदतपूर्व बदल्यांचे आदेश अखेर महासंचालक कार्यालयाने फिरविले आहेत.

यवतमाळ : पोलीस निरीक्षकांच्या मुदतपूर्व बदल्यांचे आदेश अखेर महासंचालक कार्यालयाने फिरविले आहेत. ‘मॅट’च्या आदेशावरून १४ अधिकाऱ्यांना पूर्वपदावर नियुक्त करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने २४ व २६ मे रोजी राज्यातील सहायक निरीक्षक, पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. मात्र, या याद्या वादग्रस्त ठरल्या. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. विशेषत: ७० पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी सर्वाधिक वादग्रस्त ठरली. या यादीतील अर्ध्याहून अधिक पोलीस निरीक्षकांनी ‘मॅट’च्या (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) मुंबई, नागपूर व औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. ‘मॅट’नेही त्यांच्या बदलीला स्थगनादेश देताना पूर्वपदावर कायम ठेवण्याचे आदेश दिले.‘मॅट’च्या आदेशाच्या अधीन राहून पोलीस महासंचालक कार्यालयाने ४ जून रोजी १४ पोलीस निरीक्षकांना पूर्वपदावर कायम ठेवत असल्याबाबतची पहिली यादी जारी केली. हे सर्व अधिकारी पुणे पोलीस आयुक्तालयातील आहेत. त्यातील काहींना लोहमार्ग, सीआयडी, नागपूर शहर, अमरावती शहर, वर्धा, राज्य गुप्तवार्ता विभाग येथे पाठविण्यात आले होते. मात्र, आता त्यांना पूर्वीच्या ठिकाणी पुन्हा नेमणुका देण्यात आल्या. (प्रतिनिधी)>नामुष्कीची वेळ : एकूण ७० अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीतील ४० ते ५० अधिकाऱ्यांनी ‘मॅट’मध्ये जाऊन स्थगनादेश मिळविण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या पूर्वपदावर नियुक्त्या करण्याची नामुष्की पोलीस महासंचालक कार्यालयावर आली आहे. >गृह जिल्ह्याचा नियम डावललासेवानिवृत्तीची एक-दोन वर्षे शिल्लक असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या गृहजिल्ह्यात बदली देण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, सहायक निरीक्षक व निरीक्षकांच्या बदल्यांच्या वेळी हा आदेश डावलला गेला. अनेकांनी संबंधित वरिष्ठांच्या प्रत्यक्ष पेशीत जाऊन विनंती करूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.अशा अधिकाऱ्यांची संख्या ४० ते ४५ पेक्षा अधिक आहे. सेवानिवृत्ती तोंडावर असल्याने निवृत्तीचे लाभ मिळण्यात अडचण निर्माण होण्याच्या भीतीने या अधिकाऱ्यांनी ‘मॅट’मध्ये जाणे टाळले, हे विशेष.