अरूण वाघमोडे अहमदनगर : सत्ता आल्यानंतर वर्षभरात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारने चार वर्षे ‘टिस’च्या (टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायसेन्स) अहवालाचा संदर्भ दिल्याने धनगर समाजात नाराजी आहे़ गुरुवारी चोंडी व मुंबई येथे होणाºया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्यात समाजबांधव नेत्यांना जाब विचारणार आहेत.चोंडी (ता़ जामखेड) येथे पालकमंत्री राम शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या २९३व्या जयंती सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे़ प्रमुख पाहुण्या म्हणून लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व खा. छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत़ समाजातील सहा आमदारांसह दहा माजी आमदारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे़राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि कॅबिनेटमंत्री महादेव जानकर यांनीही दरवर्षीप्रमाणे मुंबईत जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे़ दोन्ही ठिकाणीच्या मेळाव्यात आरक्षणाबाबत ठोस आश्वासन मिळावे,अशी समाजाची अपेक्षा आहे़अनुसूचित जमातीच्या इंग्रजी यादीतील धनगड व महाराष्ट्रातील धनगर समाज एकच आहेग़ेल्या ७० वर्षांपासून ‘धनगड’ व ‘धनगर’ या शब्दांच्या उच्चारात ‘र’चा ‘ड’ केल्याने समाज हक्काच्या आदिवासी सवलतीपासून वंचित राहिला़ मराठी यादीत धनगर असे नमूद केले आहे.
अहवालात अडकले ‘धनगर‘ आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 5:12 AM