नगर: गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. आताच्या घडीला शिवसेना नेते अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत असून, यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला जात आहे. यातच आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली असून, केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन भाजप नेते चौकशा लावतात, असा आरोप केला आहे. (dhananjay munde criticised bjp over ed cbi action on maha vikas aghadi leaders)
“ठाकरे व पवार पाठीत खंजीर खुपसणारे राजकारणी, हे चंद्रकांत पाटलांचे वास्तववादी भाष्य”
भाजपचे नेते ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा अनेक केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन विरोधी नेत्यांच्या चौकशा लावते. सुरुवातीपासूनच भाजपकडून अतिशय बदल्याचे राजकारण केले जात आहे. हे केवळ महाराष्ट्राला नाही, तर संपूर्ण देशाला कळून चुकले आहे, या शब्दांत धनजंय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका
खरे काय हे सर्वांच्या समोर येणार आहे
खरे काय हे सर्वांच्या समोर येणार आहे. सीबीआय प्रकरणात अनिल देशमुख यांना क्लिन चीट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गृहमंत्री राहिलेल्या व्यक्तीलाही बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. हे भाजपचे ठरलेले तंत्र आहे, असा दावा करत ३० वर्षांपासून अधिकारी एकाच ठिकाणी काम करत असतील, तर त्यांची बदली व्हायला पाहिजे. हे स्वाभाविक आहे. कायदा-नियमाला धरून सर्व बदल्या केल्या आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
“BJP नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”; काँग्रेसचा खोचक टोला
राज्य सरकार सकारात्मक
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर आला म्हणून नुकसान झाले. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. प्राथमिक किती नुकसान झाले हे आम्हाला सांगितले आहे. मात्र, वास्तविक किती नुकसान झाले याचा अहवाल यायला दोन-तीन दिवस लागतील, पण जे काही नुकसान झाले त्याबाबत भरपाई देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड
दरम्यान, केवळ महिला घरात होत्या, असे असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयावर घरात जाऊन कारवाई करण्यात आली. हे चुकीचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणात, देशाच्या राजकारणात अशा प्रकाराला कधीच जागा नव्हती. महाविकास आघाडीचे काम आणि जनसामान्यांमध्ये महाविकास आघाडीबद्दल जे प्रेम आहे, ते गेल्या दीड वर्षात चांगल्या रितीने चाललेले आहे. राज्य सरकारची लोकप्रियता वाढत चालली आहे. दुसरे काही विषय नसल्यामुळे सत्तेचा गैरवापर केला जातोय. याआधी अशा प्रकारचे दडपशाहीचे काम पाहिलेले नाही, असा यंत्रणेचा वापर केव्हाही पाहिलेला नाही. ईडी, सीबीआय हे सरकारी नियंत्रणात आहेत, त्यांच्या संघटनेतील माहिती लीक कशी होते ती कशी केली जाते? सुडाचे राजकारण कधी ऐकलेले नाही, महाराष्ट्रात हे राजकारण टिकणारे नाही, केंद्र सरकारची वागणूक अतिशय दुर्दैवी आहे, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीबीआय कारवाईवरून टीकास्त्र सोडले आहे.