मुंबई - राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले असून, ठीक-ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच मेळाव्यात औरंगाबादमध्ये बोलताना विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यानी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अमित शहांच्या गुजरातमध्ये जेवढी बस स्टँड त्यांना बनवता आली नाहीत, त्यापेक्षा अधिक विमानतळे पवारांनी महाराष्ट्रात बनवली असल्याचा खोचक टोला मुंडेंनी शहा यांना लगावला.
सोलापूर येथे महाजनादेश यात्रेची सभा झाली होती. या सभेत बोलताना अमित शाह यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं” अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना मुंडे म्हणाले की, पवारांनी महाराष्ट्रात जेवढे विमानतळे केलीत तेवढी बस स्टँड सुद्धा शहा यांना त्यांच्या गुजरातमध्ये करता आली नसल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.
तर भाजपने आपली दरवाजे उघडली तर राष्ट्रवादीमध्ये पवार यांच्या वेतिरिक्त राष्ट्रवादीत कुणीच शिल्लक राहणार नसल्याची टीका सुद्धा शहा यांनी यावेळी केली होती. त्यावर बोलताना मुंडे म्हणाले की, पवारांना महाराष्ट्रातून संपवण्याचा विचार शहा यांनी करू नयेत. तसेच जोपर्यंत तरुण कार्यकर्ते पवारांसोबत आहे. तोपर्यंत राष्ट्रवादीला कुणीही संपवू शकत नसल्याचा दावा मुंडे यांनी केला. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापताना दिसत नाही.