शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

तब्येतीचं कारण सांगत अजित पवारांच्या कार्यक्रमाला मुंडेंची 'दांडी', पण मुलीच्या फॅशन शोला मात्र उपस्थिती; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:23 IST

Dhananjay Munde : संबंधित फॅशन शोचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना टाळले तर नाही ना? की खरोखरच उपचार होते? अशी चर्चा सुरू झाली आहे आणि संभ्रमही निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता धनंजय मुंडे काय बोलतात? हे बघणे महत्वाचे ठरेल.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बुधवारी बीड दौऱ्यावर होते. पण, अजित पवार यांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे तब्येतीचे कारण देत अनुपस्थित राहिले. मात्र, ते एकदिवस आधीच (मंगळवारी) रात्री उशिरा मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका फॅशन शोच्या कार्यक्रमात पत्नी राजश्री मुंडे यांच्यासोबत उपस्थित असल्याचे दिसून आले. या फॅशन शोमध्ये त्यांची मुलगी वैष्णवी हिने सहभाग घेतला होत. या कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. यानंतर आता, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आणि योजनांचा आढावा घेताल. मात्र, त्यांच्यासोबत आमदार धनंजय मुंडे नव्हते. आपली प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने, काल उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. यामुळे आपण उपमुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्यादरम्यान उपस्थित राहू शकणार नाही, अशी पोस्ट मुंडे यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली होती. 

धनंजय मुंडेंची पोस्ट - आमदार धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हटले होते, "उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. मात्र, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे  बीडमधील आजच्या  कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी @Mahancpspeak पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती." असे मुंडे यांनी म्हटले होते.

दरम्यान, संबंधित फॅशन शोचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना टाळले तर नाही ना? की खरोखरच उपचार होते? अशी चर्चा सुरू झाली आहे आणि संभ्रमही निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता धनंजय मुंडे काय बोलतात? हे बघणे महत्वाचे ठरेल.

महत्वाचे म्हणजे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या या दोऱ्यादरम्यान मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धसहे उपस्थित होते. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMumbaiमुंबईPoliticsराजकारण