मुंबई : गेल्या काही दिवसांत अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याच्या घटना समोर येत आहेत. यातच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेही फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. ‘मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाउंटवरून ॲडमिन आणि मॉडरेटर म्हणून कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. त्यामुळे फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला ॲडमिनचे अधिकार देत पेज सुरू करावे,’ अशी मागणी फेसबुककडे केली आहे. याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे रितसर तक्रार दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यानुसार, सायबर विभाग अधिक तपास करत आहेत.
धनंजय मुंडे यांचे फेसबुक अकाउंट हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 7:02 AM