शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

" धनंजय... या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा !" - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 5:11 PM

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15  डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी राज्यातील खड्डे आजही कायम असून हल्ल्याबोल यात्रेच्या निमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार यांनाही आज त्याचा त्रास सहन करावा लागला.

ठळक मुद्दे" धनंजय... या खड्ड्यांचा सेल्फी काढून तूच त्या चंद्रकांतदादा पाटलांना पाठव रे बाबा !"चंद्रकांत पाटील यांनी 15  डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी राज्यातील खड्डे आजही कायम

लातूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15  डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी राज्यातील खड्डे आजही कायम असून हल्ल्याबोल यात्रेच्या निमित्ताने मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनाही आज त्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे एरवी सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या  अजितदादांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना,  धनंजय तूच या खड्ड्यांचे सेल्फी काढ अन चंद्रकांत दादांना पाठव रे  बाबा,  म्हणत सेल्फीत भाग घेत आपली नाराजी दाखवली.

आज औसा (लातूर) येथील हल्लाबोल सभा झाल्यानंतर निलंगामार्गे उदगीरला जात असताना अजितदादांना रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. रस्त्यांची परिस्थिती पाहून निराश झालेल्या अजितदादांनी रस्त्याची पाहणी करण्यासाठी उतरले. यावेळी धनंजय मुंडे यांनी दादांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी चालवलेल्या #selfiewithpotholes अभियानाची आठवण करुन दिली. त्यावर दादांनी गंमतीदार उत्तर दिले. “धनंजय... आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींना या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, तर रोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांचे काय हाल होत असतील? मला काही ते सेल्फी बेल्फी  जमत नाही. तूच या खड्ड्यांचा सेल्फी काढून त्या चंद्रकांत पाटलांना पाठव रे बाबा...” असे सांगितले.  सोशल मिडियावर सक्रीय असलेल्या मुंडे यांनी मग तात्काळ आपल्या फोन मधून त्या खड्ड्यांसह सेल्फी काढत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटर वर पाठवला.... 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा मराठवाड्यात सुरु आहे. उस्मानाबाद, बीड आणि आज लातूर जिल्यात हल्लाबोल सभा झाल्या. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्व नेते मराठवाड्यात आहेत. कालच भूम ते पाटोदा प्रवास केल्यानंतर पाटोदा येथील सभेत अजितदादांनी खड्ड्यावरून सरकारवर टिका केली होती. मराठवाड्यात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही, असं ते म्हणाले होते.  मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डा दाखवा हजार रुपये मिळवा, असे आवाहन केले होते. त्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोशल मीडियावर #selfiewithpotholes असे कॅम्पेन चालवले. ज्याला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. माध्यमानीही दखल घेतली. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्यात एक खड्डा दिसणार नाही, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा ही डेडलाईन पुढे ढकलून १५ जानेवारी करण्यात आली. मात्र आजही मराठवाड्याच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे आपल्या बघायला मिळतात. आता स्वतः माजी उपमुख्यमंत्री यांनीच रस्त्यातील खड्ड्याची सेल्फी काढून पाठवल्याने चंद्रकांत दादा त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे