शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कोल्हापुरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड

By admin | Published: February 07, 2017 1:18 AM

आज छाननी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी विक्रमी २,४४६ अर्ज दाखल

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी जिल्ह्यातून विक्रमी १४९७ इतके अर्ज दाखल झाले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ५०७ व पंचायत समितीसाठी ९९० अर्जांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी एकूण ८९८, तर पंचायत समितीसाठी एकूण १५४८ अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची आज, मंगळवारी छाननी होणार आहे.पाच दिवसांच्या तुलनेत सोमवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते. उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने उमेदवारांची वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली होती. वेळ संपण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर निवडणूक अधिकाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकावरून अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी निश्चित केलेल्या परिक्षेत्र परिसरात येण्याचे आवाहन करण्यात येत होते. तीन वाजता या परिक्षेत्रात असणाऱ्या उमेदवारांना आत घेऊन त्यानंतर प्रवेश बंद करण्यात आला. बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून सावध पवित्रा घेत सोमवारी अधिकृत उमेदवारांना पक्षाचे ‘ए. बी.’ फॉर्म देण्यात आले. (प्रतिनिधी)बंडखोरी टाळण्यास जोडण्याजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. त्यामुळे सायंकाळी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आता काय तरी होऊ दे...म्हणून थोडा सुस्कारा सोडला. आता माघारीसाठी व छुपी बंडखोरी टाळण्यासाठीच्या जोडण्या करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.-वृत्त/हॅलो १बोरवडेतून वीरेंद्र मंडलिकचकागल तालुक्यातील बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारीवरून सोमवारी वेगळेच नाट्य घडले. या मतदारसंघातून इच्छुक मंडलिक गटाचे भूषण पाटील यांनी चक्क ‘मातोश्री’वरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ए बी’ फॉर्म आणल्याची चर्चा उसळली, परंतु अखेर येथे शिवसेनेकडून मंडलिक यांचे नातू व संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र यांचीच उमेदवारी निश्चित झाली. -वृत्त/२अखेरच्या दिवशी दाखल अर्जतालुकाजि.प.पं.स.शाहूवाडी१८३१पन्हाळा४७८२हातकणंगले५९ १३९शिरोळ६६१२५कागल३३६४करवीर७८ १५८गगनबावडा१५२५राधानगरी३३८४भुदरगड४०७६आजरा११ २२गडहिंग्लज५९१०६चंदगड४८७८एकूण५०७९९०