मुंबई - अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी राज्यभरात धनगर समाजाने चक्काजाम आंदोलन केले. समाजबांधवांनी रास्तारोको करुन सरकारचा निषेध केला. शेळ्या-मेंढ्यांसह ढोलताशा, हलगी, पिवळे झेंडे घेऊन समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले होते.धनगर व धनगड ही प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे १ सप्टेंबरपूर्वी ही चूक दुरुस्त न केल्यास ५ लाख धनगर औरंगाबादला एल्गार पुकारतील, असा इशारा समाजाने यापूर्वीच दिलेला आहे.मराठवाड्यात चक्काजामऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड, हतनूर, पिशोर व आळंद येथे रास्ता रोको झाला. पैठण येथे मोर्चा काढण्यात आला. बीड जिल्ह्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजलगाव, धारुर, अंबाजोगाई ही शहरे बंद होती. केजमध्ये रस्त्यावर मेंढ्या उभ्या करुन आंदोलन केले. जालना जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. बीडमध्ये उपोषण करण्यात आले.उस्मानाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले़नांदेड जिल्ह्यात बिलोली, नायगांव, कंधार, लोहा, सोनखेड, धनगरवाडी, चोरंबा फाटा या ठिकाणी रास्ता रोको झाला़ बिलोली येथील आंदोलनामुळे नांदेड-हैद्राबाद महामार्ग दोन तास बंद होता़ लोहा येथे मेंढ्या घेऊन तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़नांदेड शहरात तरुणांनी दुचाकी रॅली काढली़ धर्माबाद येथे बंद पाळण्यात आला़ कंधार तालुक्यातील कुरुळा येथेही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़ भोकर येथे धरणे देण्यात आले.लातूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निलंगा, रेणापूर, अहमदपूर आणि जळकोट येथे रास्ता रोको करण्यात आलकोणत्या मुद्द्यांच्या आधारे आरक्षणाची मागणी?बॉम्बे रजिस्ट्रेशन अॅक्टमध्ये ‘धनगर’ ऐवजी ‘धनगड’ असा उल्लेखउच्चार धनगर किंवा धनगड असो, अर्थ समान असल्याचा दावावषार्नुवर्षे मेंढीपालनाचा व्यवसायनृत्य, गायन, देव-देवतांसंदर्भात खास संस्कृतीभटकी जमात असल्याचा उल्लेखबिहार, झारखंडमध्ये आदिवासी जमातीत समावेशधनगर समाजाला आरक्षण मिळावे या आणि इतर मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात मेंढयांसह मोठया संख्येने सहभागी झालेले बागलाण तालुक्यातील धनगर समाज बांधव.नाशिक : सटाणा आणि मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. खान्देश, ठाणे, कोकणातील काही ठिकाणी आंदोलन झाले.विदर्भात शेळ्या-मेंढ्यांसह रास्ता रोकोनागपूर : विदर्भातही आंदोलन झाले. नागपूर-वर्धा महामार्गावर डोंगरगाव येथे धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक खा. डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर मेंढ्या सोडल्यान वाहतूक खोळंबली होती. पश्चिम वºहाडात ठिकठिकाणी रास्ता रोको झाला. बुलडाण्यात भजन करून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.कोल्हापुरात धरणेकोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ‘आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे’, ‘यळकोट, यळकोट...जय मल्हार’ असा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण करत समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले.कोल्हार (जि.अहमदनगर) : कडीत, मांडवे, फत्याबाद, गंगापूर, चिंचोली गावातील धनगर बांधवांनी नगर-मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केले.चौंडीत ८ सप्टेंबरला मेळावाचौंडी (जि. अहमदनगर) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीदिवशी धनगर समाजाचा मेळावा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येर्ईल, असे यावेळी सांगण्यात आले.जुनोनी येथे रस्ता रोकोसोलापूर - सांगोला तालुक्यातील जुनोनी, कोळा, बुध्देहाळ, गौडवाडी, जुजारपूर, बेवनूर, सह पंचक्रोशीतील धनगर समाज बांधवांनी सांगोला-मिरज रोडवरील जुनोनी गावात रस्ता रोको केला.सांगलीत एल्गारसांगली : सांगली जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे, निदर्शने अशाप्रकारची आंदोलने करण्यात आली. शासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत प्रश्न सुटला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.बारामती, इंदापूरात निषेधबारामती (पुणे) : पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यात बंद न पाळता राज्य शासनाचा निषेध करीत आरक्षणाची मागणी करण्यात आली.
धनगर समाजबांधव आरक्षणासाठी रस्त्यावर, अनेक ठिकाणी शांततेत नोंदविला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 5:20 AM