शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

धनगर समाजाचा विधान भवनावर हल्लाबोल!

By admin | Published: March 16, 2017 4:07 AM

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण मिळावे, म्हणून धनगर समाज आरक्षण समिती आणि यशवंत क्रांती मोर्चा या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी

मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण मिळावे, म्हणून धनगर समाज आरक्षण समिती आणि यशवंत क्रांती मोर्चा या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विधान भवनात शिरण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटर्सच्या वेशात आलेल्या कार्यकर्त्यांनी अचानक आरक्षण देण्याची घोषणाबाजी करत प्लेकार्ड भिरकावले. या प्रकरणी मरिन लाइन्स पोलिसांनी समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्यासह ९ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.याबाबत आंदोलनाचे मुख्य संयोजक हेमंत पाटील म्हणाले की, ‘धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकीत मते मिळवणारे सरकार आता आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देत आहे. एवढेच नाही, तर धनगर आरक्षणाचा आवाजही दाबला जात आहे. आधी धनगर समाजाच्या नेत्यांना मंत्रिपदे देऊन सरकारने आंदोलनात फूट पाडली. आता आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.’दरम्यान, पोलिसांना चकवा देण्यासाठी क्रिकेटर्सचे कपडे घालत आंदोलन करणाऱ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. धनगर समाज आरक्षणावर टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस) या संस्थेची केलेली नेमणूक त्वरित रद्द करावी आणि धनगर समाजाच्या विकासासाठी आर्थिक बजेट ४ कोटी तातडीने मंजूर करावे, या समितीच्या प्रमुख मागण्या आहेत. कार्यकर्त्यांना गेटवर अडवणाऱ्या पोलीस व धनगर समाज बांधवांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर, आंदोलनकर्त्यांना मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हे दाखल करण्यात आले. सायंकाळी सर्व कार्यकर्त्यांची जातमुचलक्यावर सुटका झाली.(प्रतिनिधी)