धारावीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 02:01 PM2019-08-13T14:01:48+5:302019-08-13T14:11:32+5:30

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे.

Dharavi Assembly elections congress and shivsena | धारावीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का ?

धारावीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का ?

googlenewsNext

मुंबई - अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे हळूहळू वाहू लागले आहे. आशिया खंडातील सर्वत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत, विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या चार विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात पुन्हा काँग्रेस आणि शिवसेनेत लढाई होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर यावेळी तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का अशी चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे.

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे. आघाडीत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ युतीत शिवसेनेला सोडलेला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी काँग्रेस विरोधात शिवसेना हा संघर्ष विधानसभा निवडणुकीत पहायला मिळत असते. काँग्रेसच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड ह्या सलग तीन वेळापासून या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. मात्र गेल्यावेळी वेगवेगेळे लढणाऱ्या भाजप-शिवसेनेत यावेळी युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. त्यामुळे २०१४ मध्ये १५ हजार ३२८ मतांनी पराभव स्वीकारावा लागणाऱ्या शिवसेने सोबत यावेळी भाजपची ताकद असणार आहे.

सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीचा पुनर्विकास प्राधान्याने केला जाईल, असं स्पष्ट केलं होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाहीत. त्यामुळे युतीवर मतदारांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आमदार गायकवाड मतदार संघाच्या विकासाकडे लक्ष दिलं नसल्याचाही आरोप जनतेतून होताना दिसतोय. त्यामुळे मतदारांची नाराजी दूर करण्याचे आव्हान दोन्ही पक्षासमोर असणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसमधुन विद्यामान आमदार वर्षा गायकवाड यांचे नाव अंतिम समजले जात आहे. तर युतीत सेनेकडून बाबुराव माने यांनी पुन्हा कंबर कसली आहे. गेल्यावेळी माने यांचा १५ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. त्याच बरोबर सेनेतून मनोहर रायबागे हे देखील इच्छुक आहेत. युती झाली आणि नाही झाली तरीही प्रत्येकवेळी काँग्रेस आणि सेनेतच खरी लढत या मतदारसंघात पहायला मिळत असते. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला शिवसेना सुरुंग लावणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Web Title: Dharavi Assembly elections congress and shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.