मुंबई : धारावीकरांना हक्काचे ४०० चौरस फु टाचे घर मिळावे म्हणून धारावी बचाव आंदोलन अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. मात्र अजूनही त्यांना या लढ्यामध्ये यश आलेले नाही. म्हणूनच आता धारावीकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची तयारी करीत आहेत. धारावीकरांच्या अजून काही मागण्या आहेत. मात्र प्रमुख मागणीही अजून पूर्ण होताना दिसत नाही. इतर काही जण अडथळे निर्माण करीत आहेत. म्हाडाच्या माध्यमातून राज्य सरकारने विकासकांच्या फायद्यासाठी जबरदस्तीने प्रकल्प सुरू केले आहेत. धारावी हे मोक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे अनेक विकासकांचा या जागेवर डोळा आहे. येथील रहिवाशांना या जागेचा फायदा न देता विकासकांना हा फायदा द्यायचा, असे षडयंत्र असल्याचा आरोप आंदोलनाने केला आहे.कोणत्याही प्रकारचा विकास करताना धारावीतील रहिवाशांच्या हरकती आणि सूचना मागवून त्यानुसार कारवाई होणे गरजेचे आहे. म्हणूनच आता आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्याचे ठरवले आहे. यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. (प्रतिनिधी)
धारावीकर आता मोदींना भेटणार!
By admin | Published: June 09, 2014 2:54 AM