शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

धर्मा पाटील आत्महत्या : शिवसेना मंत्र्यांचा आक्रमक पवित्रा, मंत्रिमंडळ बैठकीतही मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 6:00 AM

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची गर्जना करणाºया शिवसेनेने सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली असून त्याचे पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले.

- विशेष प्रतिनिधीमुंबई : आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची गर्जना करणाºया शिवसेनेने सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली असून त्याचे पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि रामदास कदम या तीन ज्येष्ठ सेना मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला चांगलेच धारेवर धरले.परिवहन मंत्री रावते यांनी शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणावरून सरकारला घेरले. आधीच्या सत्ताधाºयांनी शेण खाल्ले म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यांना दोष देण्याऐवजी आपण शेतकºयांसाठी काय करतोय ते सांगा. मुख्यमंत्री परदेशात होते म्हणून मी त्यांना दोष देणार नाही; पण काल ज्या पद्धतीने पर्यटन मंत्री जयकुमार रावल बोलले ते योग्य नव्हते. पूर्वीच्या अधिकाºयांवर कारवाई करू असे ते म्हणत होते. गेल्या साडेतीन वर्षांत धर्मा पाटील यांना त्रास देणाºया अधिकाºयांवर कारवाई करा, असे रावते यांनी ठणकावल्याचे सूत्रांनी सांगितले. आमच्या भावना लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मा पाटील मृत्युप्रकरणी चौकशी करून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल सादर करण्यास मुख्य सचिवांना सांगितल्याची माहिती रावते यांनी पत्रकारांना दिली.एसईझेड रद्द, मग काय आणणार?नवी मुंबईतील एसईझेड रद्द करून त्या ठिकाणच्या १८०० हेक्टर जमिनीपैकी ८५ टक्के जमिनीवर उद्योग आणि १५ टक्के जमिनीवर घरे बांधण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळासमोर येताच ८५ टक्के जमिनीवर नेमके कोणते उद्योग येताहेत याची आपल्याला काहीही कल्पना नाही, असा हल्लाबोल उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला.पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी कोकणच्या विकासाकडे काही खाती मुद्दाम दुर्लक्ष कशी करीत आहेत, याची उदाहरणे दिली आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी केली.एसईझेडमध्ये येणाºया उद्योगांचे नियंत्रण उद्योग विभागाकडे होते.आता हे क्षेत्र एसईझेड मुक्त करून त्याचे नियंत्रण नगरविकास विभागाकडे दिले जात आहे. त्यालाही आमचा विरोध नाही पण ८५ टक्के जमिनीवर कोणत्या प्रकारचे उद्योग येणार हे जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे, असे देसाई यांनी सुनावले.अनेक लहानमोठ्या कंपन्यांना मुंबईनजीक उद्योग उभारणीसाठी जागा हव्या असतात त्यासाठी त्या माझ्या खात्याकडे विचारणा करतात. अशावेळी नवी मुंबईनजीक कोणत्या प्रकारच्या उद्योगांची उभारणी सरकारला अपेक्षित आहे, हे उद्योग मंत्री म्हणून मलाच माहिती नसेल तर मी त्यांना काय सांगणार, असा सवाल त्यांनी केला आणि निर्णय राखून ठेवण्याची त्यांनी मागणी केली.सूत्रांनी सांगितले की ८५:१५ चा निर्णय आपल्याला आजच घ्यावा लागेल कारण, केंद्र सरकारने त्यासाठी दिलेली मुदतसंपत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निर्णयास मंत्रिमंडळाने मान्यता दिली पण ८५ टक्के जागेवरनेमके कुठले उद्योग येणार याची माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले....तर तुमच्याही खुर्च्या जळतील : सुधीर मुनगंटीवारशिवसेनेचे मंत्री आक्रमक झाल्यानंतर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर निशाणा साधला. ‘धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकतील’, असे शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटले होते.त्याचा समाचार घेताना मुनगंटीवार म्हणाले की, खुर्च्या फक्त आमच्याच (भाजपाच्या) जळतील असे नाही तर त्यांच्याही जळतील हे त्यांनी लक्षात घ्यावे. सरकारमध्ये एकत्र असताना जबाबदारीने वागले पाहिजे. सरकार चालविणे ही सामूहिक जबाबदारी असते.शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहेच. माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नका, असे धर्मा पाटील यांच्या मुलाने म्हटले असताना इतर कोणी राजकारण करण्याचे कारणच काय, असा चिमटाही मुनगंटीवारयांनी काढला. 

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार