शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

‘संथारा’ समर्थनार्थ धर्म बचाव आंदोलन

By admin | Published: August 25, 2015 5:42 AM

‘संथारा’ व्रत बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जैन समाजाने सोमवारी राजधानी नवी दिल्लीसह देशाच्या अनेक भागांत तसेच

नवी दिल्ली/मुंबई : ‘संथारा’ व्रत बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जैन समाजाने सोमवारी राजधानी नवी दिल्लीसह देशाच्या अनेक भागांत तसेच महाराष्ट्रभरात मूक मोर्चे काढून आणि बंद पाळून जैन धर्माच्या या परंपरेचे समर्थन केले. अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी नवी दिल्ली येथे संथाराच्या समर्थनार्थ देशव्यापी ‘धर्म बचाव आंदोलना’चा शंखनाद केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचा प्रतिध्वनी उमटला. भारतीय संविधानात सर्व नागरिकांना पूजा, अर्चना आणि साधना करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे, असे विविध धर्मांच्या नेत्यांनी म्हटले आहे. संथाराच्या समर्थनार्थ जैन समाजातर्फे सोमवारी नवी दिल्लीत एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विविध धर्मांच्या नेत्यांनी भाग घेतला. राजस्थान उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी संथारा ही आत्महत्या असल्याचे सांगून त्यावर प्रतिबंध घातला आहे. विदर्भात शांतीमोर्चाविदर्भात ठिकठिकाणी शांती मोर्चा काढण्यात आला. सर्वधर्मीयांनी त्यास समर्थन दिले. नागपूरमध्ये मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. विजय दर्डा, खा. अजय संचेती उपस्थित होते. जैन संत पूर्णचंद्र सूरीश्वरजी महाराज, दिगंबर संत मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज, गिरनारसागरजी महाराज, पीयूष सागरजी महाराज, रविपद्मनंदीजी महाराज, जैन साध्वी प्रफुल्लाजी आदींनी मार्गदर्शन केले.अमरावती, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला. पुसद येथे २५ जणांनी मुंडण करून संथारा बंदीचा निषेध नोंदविला. औरंगाबादमध्ये धर्मसभाऔरंगाबादमध्ये सर्व पंथांतील साधू-साध्वीजी तसेच समाजबांधवांनी एकत्र येऊन शांतीपूर्ण मार्गाने निषेध व्यक्त केला. जैन बांधवांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर निघालेल्या मूक मोर्चाचे धर्मसभेत रूपांतर झाले. प.पू. विशालमुनिजी म. सा. यांनी मार्गदर्शन केले. जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यात समाजबांधवांनी मूक मोर्चे काढून प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.सोलापूरमध्ये व्यवहार बंदसोलापूर जिल्ह्यात जैन बांधवांनी व्यवहार बंद ठेवून मूक मोर्चा काढला. मोडनिंबमध्ये मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. नाशिकमध्ये बाजार समित्या बंदनाशिक जिल्ह्यात लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी शहरातील आंदोलनाचे नेतृत्व केले.अकोल्यात कडकडीत बंदजैन समाजातर्फे अकोला जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चेही काढले.कोल्हापूरमध्ये सह्यांची मोहीमकोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी शांततापूर्ण मार्गाने धर्म बचाव आंदोलन झाले. जयसिंगपूरमध्ये एक लाख सह्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.नगरमध्येही बंदसकल जैन समाजाने सोमवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. जैन बांधवांनी दुकाने बंद ठेवली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)खान्देशात निषेधखान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जामनेरमध्ये जैन साध्वींनी मोर्चाचे नेतृत्व केले. अध्यादेश काढण्याची मागणी‘संथारा’ची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी केंद्राने वरिष्ठ वकिलामार्फत आणि जैन संतांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. परंपरा कायम ठेवण्यासाठी अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, अशी मागणी पुण्यात सकल जैन समाजातर्फे करण्यात आली. पंतप्रधान, मुख्यमंत्री व केंद्रीय अल्पसंख्याकमंत्र्यांसाठीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांना देण्यात आले.