महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये भाजपाचं 'कमळ' फुलण्याचा सिलसिला धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळतोय. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हातात हात आणि शिवसेनेनं सोडलेली साथ, अशा परिस्थितीतही भाजपाने धुळे आणि नगरमध्ये मुसंडी मारली आहे.
२०१३ साली झालेल्या धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. अहमदनगरमध्येही त्यांचे फक्त नऊ नगरसेवक होते. परंतु, आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत भाजपाने धुळ्यात ३० जागांचा टप्पा ओलांडला आहे, तर नगरमध्ये १९ जागांवर आघाडी घेतलीय. अनिल गोटे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानं काँग्रेस आघाडीसह, शिवसेनेच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, लोकसंग्राम पक्षाला मतदारांनी साफ नाकारलंय. त्यातून अनिल गोटेंबद्दलची नाराजी दिसते. त्यामुळे त्यांचं बंड भाजपाच्या पथ्यावरच पडल्याचं मानलं जातंय. तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील मतदारांचा विश्वास, या निकालांमधून पुन्हा सिद्ध झाला आहे. मराठा आरक्षणही भाजपाला फळल्याचं जाणकारांचं मत आहे.
धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकांमध्ये त्रिशंकू निकाल लागतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे अंतिम आकडे कसे असतात आणि त्यानंतर काय समीकरणं पाहायला मिळतात, याबद्दल उत्सुकता आहे.
LIVE UPDATES साठी खालील लिंकवर क्लिक करा...