एक हजार ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धूमशान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 02:04 AM2018-08-24T02:04:47+5:302018-08-24T06:53:01+5:30

राज्याच्या २६ जिल्ह्यांतील एक हजार ४१ ग्राम पंचायतींची निवडणूक २६ सप्टेंबर रोजी होणार असून त्या निमित्ताने ग्रामीण राजकारण तापणार आहे.

Dhumashan of one thousand gram panchayat elections | एक हजार ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धूमशान

एक हजार ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धूमशान

Next

मुंबई : राज्याच्या २६ जिल्ह्यांतील एक हजार ४१ ग्राम पंचायतींचीनिवडणूक २६ सप्टेंबर रोजी होणार असून त्या निमित्ताने ग्रामीण राजकारण तापणार आहे. या शिवाय, ६९ ग्राम पंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठीही त्याच दिवशी मतदान होईल.
राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान स्वीकारले जातील. छाननी १२ सप्टेंबरला होईल. अर्ज १५ सप्टेंबर रोजी मागे घेता येतील. मतदान २६ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २७ सप्टेंबरला होईल.

पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा : ठाणे ४, रायगड ३, सिंधुदुर्ग १, नाशिक ८, धुळे २, जळगाव १, पुणे ६, सातारा ३, सांगली १०, उस्मानाबाद १, जालना २, यवतमाळ ३, वाशीम ६, बुलडाणा २, नागपूर १, चंद्रपूर २ व गडचिरोली १४.

जिल्हानिहाय ग्रामपंचायती निवडणूक होणाºया ग्राम पंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी :
ठाणे - ६, रायगड १२१,रत्नागिरी ९, नाशिक २४, धुळे ८३, जळगाव ६, अहमदनगर ७०, नंदुरबार ६६, पुणे ५९, सोलापूर ६१, सातारा ४९, सांगली ३, कोल्हापूर १८, बीड २, नांदेड १३, यवतमाळ ३, बुलडाणा ३, अकोला ३, नागपूर ३८१, वर्धा १५, चंद्रपूर १५, भंडारा ५ आणि गडचिरोली ५

Web Title: Dhumashan of one thousand gram panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.