शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

जळगावमधील तांबापुरात दोन गटात धुमश्चक्री

By admin | Published: July 24, 2016 12:59 AM

क्षुल्लक कारणावरुन तांबापुरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता दोन गटात जोरदार वाद झाला. त्यात एका गटाकडून तलवारी काढण्यात आल्या; तर प्रतिस्पर्धी गटाकडून

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २४ -  क्षुल्लक कारणावरुन तांबापुरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता दोन गटात जोरदार वाद झाला. त्यात एका गटाकडून तलवारी काढण्यात आल्या; तर प्रतिस्पर्धी गटाकडून प्रत्युत्तर म्हणून विटांचा मारा करण्यात आला. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी दोन्ही गटाच्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून अन्य संशयितांची रात्रभर धरपकड सुरु होती.लहान मुलांच्या भांडणावरुन वाद उफाळलाशिरसोली नाक्याला लागून असलेल्या तांबापुरात शुक्रवारी संध्याकाळी बावरी व गवळी गटात लहान मुलांच्या भांडणावरुन वाद झाला होता. हा वाद शनिवारी रात्री पुन्हा उफाळून आला. समाधान हटकर (गवळी) याला मारण्यासाठी बावरी गटाकडून दहा ते बारा जण धावून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गवळी गटाचेही दहा ते बारा जण धावून आले. बावरी गटाने तलवारी काढून गवळी गटावर चाल केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून गवळी गटाने विटा व दगडांचा मारा सुरु केला. त्यामुळे तांबरापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांवर दगडफेकतांबापुरात दोन गटात वाद झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी कर्मचारी रवाना केले. तर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनीही कमांडो पथक रवाना केले, त्यामुळे संशयितांची पळापळ झाली. धरपकड मोहीमेत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. सहायफ फौजदार रत्नाकर झांबरे, शरद भालेराव, अशरफ शेख, गोविंदा पाटील, परेश जाधव, विजय पाटील आदी कर्मचाऱ्यांच्या दिशेनेही दगडफेक झाली. मात्र त्यापासून त्यांनी बचाव केला. यावेळी एका चारचाकीचे नुकसान झाले आहे.सहा जण ताब्यातनिरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक समाधान पाटील, विजय आढाव, उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी आदींनी घरात घुसून संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त होता. रामानंद नगर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात परिस्थिती नियंत्रणात आली.ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये समाधान हटकर,रामा हटकर,योगेश राठोड, सतपालसिंग बावरी, कमलसिंग बावरी व बजनसिंग बावरी यांचा समावेश आहे.