मुंबई – राज्याच्या राजकारणात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घ्यावं अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सरकारला ६ महिने पूर्ण झाली आहेत. त्यावर सामनाच्या मुलाखतीत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या कामाचा रिपोर्ट कार्ड सांगितलं आहे.
मुलाखतीत (Sharad Pawar Interview with Sanjay Raut) संजय राऊत यांनी सहा महिने परीक्षेचा काळ असतो, या परीक्षा झाल्यानंतर त्याचं प्रगती पुस्तक पालकांकडे येते तसं या सरकारच्या सहा महिन्याचं प्रगती पुस्तक आपल्याकडे आलंय का? असा प्रश्न केला होता. त्यावर शरद पवारांनी बरोबर आहे, पण आता ही सहा महिन्यांची परीक्षा झालीय, परीक्षा संपूर्ण झाली असं मला वाटत नाही. परीक्षेतला प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे. आता कुठे लेखी परीक्षा झाली आहे. पण त्या परफॉर्मन्सवरुन तरी प्रॅक्टिकलमध्येही हे सरकार यशस्वी होईल असा ट्रेंड दिसतोय असं शरद पवारांनी सांगितले.
तसेच अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसत आहे. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती दिसत नाही. राज्याचा विचार करुन तुम्ही विचारत असाल तर या महिन्याच्या परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणे सोडवेल अशी खात्री आहे असंही शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)
दरम्यान, शेवटी राज्यप्रमुख महत्त्वाचा असतो, त्यांच्या नेतृत्वाखाली टीम काम करते, त्यामुळे त्याचे श्रेयसुद्धा त्यांनाच मिळणार. त्याचसोबत सध्या अर्थव्यवस्थेचं संकट आहे, ती रुळावर आणणं हे आव्हान आहे. या संकटकाळात हे फार मोठं चॅलेंज आहे असं शरद पवारांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीचं कौतुक
उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) स्वभाव आहे तो त्यांना साजेसा आहे. निर्णय घ्यायचा, तो अत्यंत सावधगिरीनं, हळूहळू, त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत, याची जेवढी खातरजमा करुन घेता येईल तेवढी करुन मग त्याच्यावर पाऊल टाकायचं अशा शब्दात शरद पवारांनी मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांकडून नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार; राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, तर...
'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण
राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची जोरदार मागणी
अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार काँग्रेस; पक्षाच्या खासदारांशी सोनिया गांधींची चर्चा
पाहा व्हिडीओ