औरंगाबाद : राज्य सरकारचा समाजकल्याण विभागातर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार जाहीर करूनही ऐनवेळी शासनाने संबंधित व्यक्तीस प्रदान का केला नाही, याचा खुलासा शासनाने तीन आठवड्यांत करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. संवत्सर (ता. कोपरगाव, जि.अहमदनगर) येथील रहिवासी संपतराव जमनराव भारुड यांचे दलित समाजाच्या विकासासाठीचे काम पाहून तत्कालीन समाजकल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी त्यांची दलित मित्र पुरस्कारासाठी निवड केली होती. पुरस्कार प्रदान सोहळ््यास उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्याचे निमंत्रणही त्यांना राज्य सरकारने पाठविले होते. पुरस्कार प्रदान सोहळ््याच्या यादीत त्यांचे नाव १३ व्या क्रमांकावर होते. (प्रतिनिधी)
‘दलित मित्र पुरस्कार’ का प्रदान केला नाही?
By admin | Published: July 02, 2015 12:45 AM