Nitin Gadkari Latest News: महाराष्ट्राचे राजकारण ज्या घटनेमुळे बदलून गेलं. त्यानंतर जे राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात झाले, त्या शिवसेनेच्या फुटीबद्दल केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना फुटणार याची थोडी माहिती मला होती, असे नितीन गडकरींनी एका मुलाखतीत सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एपीबी लाईव्ह वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत नितीन गडकरींनी शिवसेना फुटीसंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले.
वाचा >>“चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम; पुढील निवडणुकीत..."
'एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोडणार, पक्ष फुटणार याची तुम्हाला आधीपासूनच माहिती होती का?', असा प्रश्न नितीन गडकरींना विचारण्यात आला.
शिवसेनेच्या फुटीची गडकरींना माहिती होती का?
नितीन गडकरी म्हणाले, 'या सगळ्या गोष्टींबद्दल थोडी माहिती तर होती. पण, मी यावर काही बोलणार नाही.'
'महाराष्ट्रातील नेते म्हणून तुमची यात काही भूमिका होती का?', असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला.
नितीन गडकरी म्हणाले, 'बघा, पक्षामध्ये आम्ही काय बोललो आणि काय केलं, हे मुलाखतीमध्ये बोलणे; हे पक्षशिस्तीला धरून नाहीये.'
या उत्तरानंतर गडकरींना 'पक्ष फोडायला तुम्ही एकनाथ शिंदेंना मदत केली की नाही, हे सांगा', असं विचारण्यात आलं.
नितीन गडकरी म्हणाले, 'आता मी याबद्दल कोणतीही टिप्पणी करणार नाही', असे उत्तर नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या फुटीबद्दल दिले.