शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

तुम्हाला माहितीये का....रणबीर आणि आलिया एकत्र करणार होते पदार्पण

By admin | Published: April 11, 2017 10:56 PM

सावरिया चित्रपटातून पदार्पण करणा-या रणबीरने आपण आलिया भटसोबत पदार्पण करणार होतो असा खुलासा केला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - सावरिया चित्रपटातून पदार्पण करणा-या रणबीरने खरंतर आपण आलिया भटसोबत पदार्पण करणार होतो असा खुलासा केला आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भटची मुलाखत घेण्यात आली. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच आलिया आणि रणबीर कपूर यांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुलाखत घेत दोघांना बोलते केले. मुलाखत घेण्याआधी दोघांनाही आऊटस्टॅडिंग एंटरटेनर पुरस्कारने गौरवण्यात आलं. युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे. 
 
रणबीर कपूरला जेव्हा आलियाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा आपण आलियासोबत पदार्पण करणार होतो असा खुलासा केला आहे. "संजय लिला भन्साळी आलिया वधू नावाचा चित्रपट करणार होते. ज्यासाठी मी आणि आलियाने एकत्र फोटोशूटदेखील केलं होतं. तेव्हापासून मी आलियाचा चाहता आहे", असं रणबीरने सांगितलं आहे. यावर बोलताना आलियानेही आठवणी शेअर करत "मी जेव्हा रणबीरला भेटली तेव्हा फक्त 11 वर्षांची होती. तेव्हा रणबीर कपूर संजय लिला भन्साळी यांना असिस्ट करत होता. तेव्हा मला त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायचं होतं. पण मी खूप लाजरी होती. पण सावरिया पाहिल्यापासून मी त्याची चाहती आहे", असं आलियाने सांगितलं. 
 
रणबीरनेही आलियाचं कौतुक करताना आलियाचा "हायवे" चित्रपट आपल्याला प्रचंड आवडला असल्याचं सांगितलं. तो चित्रपट पाहिल्यानंतर आलिया म्हणजे अमिताभ बच्चन असल्याचं मी मित्राला सांगितलं होतं", असंही रणबीरने सांगितलं. रणबीरचा कोणता चित्रपट आवडला असं विचारलं असता ‘बर्फी’ आणि "रॉकस्टर"चं नाव आलियाने घेतलं. तसंच संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील त्याचं काम सर्वोत्तम असेल असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला. 
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा
lmoty.lokmat.com