दरवाढीचा फटका : महिन्याचा खर्च गेला २०४ कोटींवरमुंबई : एसटी महामंडळावरील आर्थिक भार वाढतच जात आहे. नुकत्याच झालेल्या डिझेल दरवाढीनंतर एसटीच्या खर्चात आणखी ४ कोटींनी वाढ होणार असल्याने डिझेलवर दरमहा होणारा खर्च आता २०४ कोटींवर गेला आहे.डिझेलच्या दरात १ रुपये ९ पैसे वाढ करण्यात आली. सध्या एसटी महामंडळाला गर्दीच्या काळात दररोज साधारणत: १३ ते १३ लाख ५० हजार लिटर डिझेल लागते, तर इतर दिवशी हेच डिझेल दिवसाला ११ लाख लिटर एवढे लागते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला २०० कोटी रुपये खर्च एसटी महामंडळाला सोसावा लागत आहे. (प्रतिनिधी)
एसटीवर वाढला डिझेलचा भार
By admin | Published: May 13, 2014 10:27 PM