शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

अवघड दिवसांमध्येही मुंबईतील या कंपनीत महिलांना पगारी रजा

By admin | Published: July 10, 2017 7:00 PM

इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान आणइ इटालीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10 - इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान आणइ इटालीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते. दक्षिण कोरियामध्ये तर ज्या महिला ही रजा घेणार नाहीत त्यांना अतिरिक्त वेतन मिळण्याचीही तरतूद आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका मिडियाबेस कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. एक जुलैपासून तो लागूही करण्यात आला आहे. मुंबईतल्या कल्चर मीडिया या कंपनीने मासिक पाळीची रजा सुरू केलीय. अशा प्रकारची रजा देणारी ती कदाचित भारतातील पहिलीच कंपनी असेल. ही कंपनी युट्यूब चॅनेल चालवते. या कंपनीत 75 महिला कर्मचारी काम करतात. तेव्हा मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचं नवं धोरण या कंपनीने सुरू केलं आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी त्रास जास्त होते तेव्हा त्यांना रजा देण्याचं कंपनीनं ठरवलं आहे. भारतामध्ये अद्याप तरी सरकारी पातळीवर महिलांना मासिक पाळीदरम्यान भरपगारी रजा देण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव आला तरी या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मु्द्दा उपस्थित होईल तो भरपाई पगाराचा आणि त्यातूनच पुढे अनेक प्रश्नांना वाटा फुटतीलच. जवळपास ३३ कोटी स्त्रियांना दरमहा किमान ३ दिवसांची भरपगारी सुटी दिल्यामुळे जो आर्थिक भार पडणार आहे तो कोण उचलणार? सरकार? की संबंधित कंपन्या? सरकारी तिजोरीवर आधीच इतका बोजा असताना, हे नवीन आर्थिक ओझं सरकारला परवडणार आहे का? तितकी आपल्या सरकारची आर्थिक क्षमता आहे का? आणि सरकारनं ते ओझं पेलायचंच म्हटलं तर त्यासाठी तरतूद कशी केली जाणार? सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातूनच यासाठी पैसा काढला जाणार का, की त्यासाठी वेगळा निधी बाजूला काढला जाईल? एकदा निधी मंजूर झाला की तो महिला कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये कसा वळता करणार? आधारसारख्या योजनांचा वापर केला जाईल की पीएफ खात्यांसारखी नवीन खाती उघडली जातील?