मुंबई : राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन धारकांना बायोमेट्रीक पद्धतीने हयातीचा दाखला देणे शक्य व्हावे, या साठी केंद्र शासनाच्या जीवन प्रमाण योजनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. केंद्र सरकारने निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला देण्याच्या दृष्टीने त्यांना बायोमेट्रीक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याकरिता केंद्र सरकारने जीवन प्रमाण ही संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. त्या द्वारे निवृत्तीवेतन धारकाने केवळ त्याचे बोट अथवा डोळे सयंत्राद्वारे स्कॅन केल्यास, तो हयात असल्याबाबत प्रमाणित होईल. या योजनेत राज्यांनी समाविष्ट व्हावे, असे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
पेन्शन धारकांना मिळणार हयातीचा डिजिटल दाखला
By admin | Published: December 03, 2015 1:25 AM