लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात डिजिटल सातबारा प्रकल्प सुरू होऊन एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. एका वर्षात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वर्षभरात राज्यात तब्बल २१ लाख ७७ हजार सातबारे व एक कोटी १० लाख खाते उतारे डाउनलोड झाले आहेत. याशिवाय महसूल विभागाने इतरही अनेक आॅनलाइन सुविधा लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.राज्यातील सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन कामासाठी लागणारा सातबारा, आठ ‘अ’चा उतारा सहज व विनाहेलपाट्याशिवाय मिळण्यासाठी शासनाने डिजिटल सातबारा प्रकल्प सुरू केला. हा प्रकल्प सुरूहोऊन एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.याबाबत या प्रकल्पाचे राज्याचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले की, राज्यात २००३ पासून संगणकीकृत सातबारा मोहीम राबविली जात आहे. या राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण २००२-०३ पासून सुरू झाले. २०१०-११ पर्यंत ते जिल्हास्तरावरच संगणकीकृत केले जात होते.आॅनलाइन सातबारा, आधुनिकीकरणमहसूल विभागाने ग्रामीण भागातील भूमिअभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमअंतर्गत सुरू असलेल्या ई-फेरफार प्रकल्पाद्वारे संगणकीकरण पूर्ण करून २०१५-१६ पासून हे सर्व संगणकीकृत अधिकार अभिलेख आॅनलाइन केले. राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्यांतील सुमारे २ कोटी ५३ लाख गाव नमुना नं. ७/१२ आॅनलाइन करून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांचे सर्व उपजिल्हाधिकारी यांनी अहोरात्र कामकाज करून हे अशक्य वाटणारे काम पूर्णत्वाकडे नेले.
डिजिटल सातबारा प्रकल्पाचा नवा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 7:37 AM