शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

डिजिटल सातबारा उतारे : पुण्यासह सर्व जिल्ह्याचे काम क्लाऊडवरून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 12:23 PM

राज्यातील २२ जिल्ह्यांचे काम क्लाऊडवरून सुरू झाले आहे. तसेच काही दिवसांपासून उर्वरित ११ जिल्हे क्लाऊडवर घेवून जाण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देदोन दिवसात पूर्ण होणार प्रक्रियाकोकण भागातील व नाशिक परिसरातील काही तालुक्यांचे डिजिटल सातबारा उताऱ्याचे काम अपूर्ण

पुणे : महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांचे काम क्लाऊडवरून सुरू झाले आहे. तसेच काही दिवसांपासून उर्वरित ११ जिल्हे क्लाऊडवर घेवून जाण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यातील बहुतांश सर्व जिल्हे क्लाऊडवर येणार आहेत.सर्व सामान्य नागरिकांना सातबारा उतारे मिळण्यासाठी तलाठी कार्यालयाकडून होणारा त्रास कमी करण्यासाठी डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम सुरू आहे. कोकण भागातील व नाशिक परिसरातील काही तालुक्यांच्या अपवाद वगळता बहुतांश सर्व तालुक्यांचे डिजिटल सातबारा उताऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, सर्व्हवर काम करताना अडचणी येत असल्याने शासनाने सर्व प्रक्रिया क्लाऊडवरून चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून टप्प्या टप्प्याने राज्यातील २२ जिल्हे क्लाऊडवर स्थलांतरित केली. आता ११ जिल्हे क्लाऊडवर घेवून जाण्याचे काम सुरू आहे.पुण्यासह अकोला, गडचिरोली, नागपूर, धुळे, भंडारा, बुलढाणा,वर्धा, अमरावती, पालघर, रायगड या जिल्ह्याची सर्व्हवरवरील माहिती क्लाऊडवर स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु, पुढील दोन दिवसात या ११ जिल्ह्याचे स्थलांतर क्लाऊडवर होणार असल्याने डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करण्याच्या प्रक्रियेस गती मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेdigitalडिजिटलonlineऑनलाइनFarmerशेतकरी