शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

एक मनस्वी कलाकार हरपला

By admin | Published: February 04, 2016 1:40 AM

अरुणा भटचा स्वभाव काहीसा भांडखोर किंवा स्पष्टवक्तेपणासारखा होता; पण त्यामागे तिची कलाकारांविषयी आपुलकी आणि तळमळ होती

पुणे : अरुणा भटचा स्वभाव काहीसा भांडखोर किंवा स्पष्टवक्तेपणासारखा होता; पण त्यामागे तिची कलाकारांविषयी आपुलकी आणि तळमळ होती. पेन्शनचा प्रश्न असो की मानधनाचा विषय असो, ती आपणहून पुढाकार घेऊन यासाठी झगडायची. वेळप्रसंगी ती शासनालाही जाब विचारण्याची हिंमत दाखवायची, अशा शब्दांत नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी अरुणा भट यांना श्रद्धांजली वाहिली. नाट्य परिषद पुणे शाखेच्या वतीने ज्येष्ठ रंगकर्मी अरुणा भट यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी बुधवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लीला गांधी, सदानंद चांदेकर, स्वरूपकुमार, दादा पासलकर, ज्योती चांदेकर, सुहासिनी देशपांडे, रजनी भट, परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, मुकुंद शेवते, श्रीराम रानडे, सुनील महाजन आणि प्रमोद आडकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वरूपकुमार म्हणाले, की नाट्य-चित्रपटसृष्टीमध्ये दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे तशी दुर्मिळ गोष्ट आहे; पण नाट्य परिषद मुंबई शाखेकडून मला जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला ती गोष्ट तिने मला सर्वप्रथम दूरध्वनी करून सांगितली. तिच्याबरोबर ‘घरोघरी हीच बोंब’ आणि ‘गुंतता पुरुष’ या नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तीन-चार दिवसांच्या आजारपणात ती जाईल, असे कुणालाच वाटले नाही.ज्योती चांदेकर म्हणाल्या, की अरुणा म्हणजे अत्यंत लाघवी आणि हसरे व्यक्तिमत्त्व होते. तिचे हास्य खळखळत्या झऱ्यासारखे होते. खूप घनिष्ठ मैत्रिणी नसलो तरी एक ॠणानुबंध जुळला होता. सुहासिनी देशपांडे यांनी पेन्शनबाबत शासनाला जाब विचारण्याच्या अरुणाने केलेल्या धाडसाची आठवण सांगितली. सर्व कलाकारांच्या अडचणी सोडविणे हा तिचा स्थायिभाव होता. पुढच्या व्यक्तीला उभारी देण्याचे सामर्थ्य तिच्यात होते, असेही त्या म्हणाल्या. अरुणा माझी सावली होती, प्रत्येक गोष्टीमध्ये तिचे परफेक्शन होते, असे रजनी भट यांनी सांगून दु:खाला मोकळी वाट करून दिली.