शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

दिलीप देशमुख ‘मांजरा’चे संचालक म्हणून अपात्र

By admin | Published: March 11, 2017 12:46 AM

मांजरा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २०१५ साली झालेल्या निवडणुकीतील माजी मंत्री, आमदार दिलीप देशमुख यांचा उमेदवारी अर्ज रद्द करून संचालक

लातूर : मांजरा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २०१५ साली झालेल्या निवडणुकीतील माजी मंत्री, आमदार दिलीप देशमुख यांचा उमेदवारी अर्ज रद्द करून संचालक म्हणून ते अपात्र असल्याचा निर्णय येथील सहकार न्यायालयाने गुरुवारी दिला आहे, अशी माहिती याचिकाकर्ते अ‍ॅड. बळवंत जाधव यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. उत्पादक, बिगर उत्पादक व पणन मतदार गटातून आ. दिलीप देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अ‍ॅड. बळवंत जाधव यांनी त्यांच्या उमेदवारीस आक्षेप घेतला होता. आ. देशमुख हे मांजरा साखर कारखान्याप्रमाणे समान उद्देश असलेल्या जागृती साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आहेत. त्यामुळे ‘मांजरा’ची निवडणूक त्यांना लढविता येणार नाही, असा आक्षेप अ‍ॅड. जाधव यांचा होता. मात्र तत्कालीन पीठासन अधिकारी प्रताप काळे यांनी त्यांचा आक्षेप फेटाळून देशमुख यांचा अर्ज मंजूर केला होता. सध्या आ. देशमुख मांजरा साखर कारखान्याचे संचालक आहेत.परिणामी, अ‍ॅड. जाधव यांनी सहकार न्यायालयात याचिका धाव घेतली. त्यावर न्यायालयाने गुरुवारी मांजरा कारखान्याचे उमेदवार म्हणून आ. दिलीप देशमुख यांना अपात्र घोषित केले असल्याचे अ‍ॅड. बळवंत जाधव यांनी पत्रपरिषदेत सांगितले. तथापि, निर्णयास न्यायालयाने ६० दिवसांची स्थगिती दिली आहे.(वार्ताहर) वरच्या कोर्टात दाद मागणारसहकार न्यायालयाने ६० दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे वरच्या कोर्टात दाद मागण्याचा अधिकार आहे. तिथे आम्हाला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया दिलीप देशमुख यांनी दिली.सहकार न्यायालयाच्या या निर्णयानंतर आ. दिलीपराव देशमुख यांनी वरच्या न्यायालयात अपिलात न जाता नैतिकता बाळगून राजीनामा द्यावा.- अ‍ॅड. बळवंत जाधव