मुंबई : गोरेगाव येथील १८ मजली इमारतीतील फ्लॅटमध्ये बेकायदेशीररीत्या वाढीव बांधकाम केल्याबद्दल मुंबई महापालिकेने टीव्ही कलावंत कपिल शर्मा याला बजावलेल्या नोटिशीला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. त्यामुळे २३ नोव्हेंबरपर्यंत महापालिकेला कपिलवर काहीही कारवाई करता येणार नाही.फ्लॅटमध्ये बेकायदेशीररीत्या वाढीव बांधकाम केल्याबद्दल महापालिकेने कपिलला २८ एप्रिल रोजी नोटीस बजावली आहे. तथापि, ही नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा कपिलने याचिकेद्वारे केला आहे.कपिल उच्च न्यायालयात येण्यापूर्वी या इमारतीचे बिल्डर देव लॅण्ड हौसिंग लि.ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवरील पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी ठेवली असल्याचे कपिलचे वकील प्रदीप थोरात यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)
कपिल शर्माला तूर्तास दिलासा
By admin | Published: October 18, 2016 2:08 AM