मुंबई: INS विक्रांत निधी संकलन प्रकरणात सत्र न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. सोमय्या पिता पुत्रांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे, सोमय्यांचा कुठेतरी गायब झाले आहेत. आता त्यांच्याबाबत केंद्र सरकारला विचारणा करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे.
'दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि...'किरीट सोमय्या यांच्याबाबत माध्यमांशी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, ''किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने 'झेड' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे, त्यांच्या ठावठिकाणाबाबत आम्ही केंद्राकडे विचारणार करणार,'' अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच, "दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि स्वत:वर आरोप झाले की, चौकशीला सामोरे जायचे नाही. हे काही शूरपणाचे लक्षण नाही,'' असा टोलाही वळसे पाटलांनी लगावला.
सोमय्या गुजरात किंवा गोव्यात- संजय राऊतशिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांबाबत महत्वाचा दावा केला आहे. गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या लपून बसल्याचा दावा राऊतांनी केलाय. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात, असंही राऊत म्हणाले.