मुंबई : अभिनेत्री डिंंपल कपाडिया, टिष्ट्वंकल खन्ना व अक्षय कुमार यांच्या विरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल असलेली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली.अनिता अडवाणी यांनी २०१२ साली ही तक्रार केली होती. मी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्या निधनानंतर डिंपल व अक्षय कुमार यांनी मला आशीर्वाद बंगल्यातून हिसकावून बाहेर काढले. त्यामुळे त्यांनी मला देखभाल खर्च व राहण्यासाठी घर द्यावे, असे अडवाणी यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्याची दखल घेत वांद्रे न्यायालयाने या तिघांना नोटीस जारी केली होती. त्याविरोधात या तिघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.त्यावर न्या. एम. एल. ताहलियानी यांच्या खंडपीठाने गुरुवारी निकाल दिला. अडवाणी या राजेश खन्ना यांच्या पत्नी नाहीत. तसेच त्या डिंपल यांच्यासोबतही राहत नव्हत्या. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत त्या डिंपल यांच्याकडून देखभाल खर्च व घराची मागणी करू शकत नाहीत, असे स्पष्ट करीत न्यायालयाने वांदे्र न्यायालयातील अडवाणी यांची तक्रार रद्द केली. (प्रतिनिधी)
डिंपल, टिष्ट्वंकल, अक्षयला कोर्टाचा दिलासा
By admin | Published: April 10, 2015 4:50 AM