नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवनातील साधुग्राममध्ये आलेले खालसे, आखाड्यातील साधू-महंतांना स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून देण्यासाठी तात्पुरत्या शिधापत्रिका वाटपास प्रारंभ झाला आहे.पाच निरीक्षकांच्या माध्यमातून थेट आखाडे, खालशांमध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. साधू-महंतांकडून शिधापत्रिकेसाठीची कायदेशीर व कागदोपत्री पूर्तता करून घेतली जात आहे. शिधापत्रिकेची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत असेल. शिधापत्रिकाधारक साधूंसाठी तपोवनातच पाच रेशन दुकाने सुरू करण्यात आसाधुंना शिधापत्रिकांचे थेट वाटपली आहेत. प्रत्येक व्यक्तीस प्रतिमहा पाच किलो धान्य स्वस्त दरात दिले जाणार आहे. तसेच तात्पुरती गॅस जोडणीही करुन दिली जात आहे. साधुग्राममध्ये सहा गॅस वितरकांना जागा देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
साधूंना शिधापत्रिकांचे थेट वाटप
By admin | Published: August 02, 2015 2:49 AM