बुलडाणा : डीएलएड अर्थात अध्यापन पदविकेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. त्यामुळे आता डिएलएड पूर्ण करणारा विद्यार्थी पदवीधर असेल तर त्याला थेट एमएड म्हणजेच स्नातकोत्तर अध्यापन पदवीसाठीचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. यासाठीच्या सीईटीस अशा उमेदवारांना पात्र ठरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन २०१०नंतर शिक्षक भरती परीक्षा न झाल्याने पदविका देणारी महाविद्यालये ओस पडली आहेत. तर यंदा शासनाकडून देण्यात आलेल्या प्रवेश अर्जावरच ‘असे शिक्षण घेतल्यास नोकरी मिळेलच याची खात्री नाही’ असे स्पष्ट नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर आता डीएलएड पूर्ण करणारा विद्यार्थी पदवीधर असेल तर त्याला थेट एमएडला प्रवेश देण्याची सवलत सुरू करण्यात आली आहे. एमएड प्रवेशासाठी २५ जुलै रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) होणार आहे.
थेट एमएड सीईटीला प्रवेश!
By admin | Published: July 14, 2015 12:40 AM