मुंबई : पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २५० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, उस्मानाबाद, औरंगाबादच्या सहा महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर येत्या १ मे रोजी त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त भारती कुऱ्हाडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल तर, पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना विलास रासम यांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवा बजाविल्याबद्दल महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. पुणे शहराच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा गजानन बांबे यांना बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविल्याबद्दल गौरवण्यात येईल. उत्तम कामगिरी केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा सुभाष काळे आणि उस्मानाबादच्या पोलीस निरीक्षक अश्विनी एस. भोसले यांचा सन्मानचिन्हाने सत्कार करण्यात येणार आहे. क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल औरंगाबाद ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिया राजाराम थोरात यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. स्पोर्ट्स व पोलीस कल्याण कलीनाचे पोलीस उपायुक्त शांतीलाल अर्जुन भामरे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त प्रदीप रोहीदास सोनावणे सन्मानचिन्हाचे मानकरी ठरले आहेत. सन्मानचिन्हाचे मानकरीमुंबईतील महिला अत्याचार विरोधी कक्ष व सायबर गुन्हेचे विशेष पोलीस महानिरिक्षक ब्रिजेश सिंह, गुन्हे शाखचे अप्पर पोलीस आयुक्त के. एम. प्रसन्ना, विशेष सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक घन:शाम मनोहर पाटील हे मानकरी ठरले आहेत.
महासंचालक सन्मानचिन्ह २५० पोलिसांना जाहीर
By admin | Published: April 14, 2016 1:34 AM