बीड : अनाथ मुलांच्या रणरणत्या आयुष्यावर चित्रपटनिर्मिती करत असलेल्या दिग्दर्शकाने चित्रीकरणादरम्यान अल्पवयीन नटीसह पोबारा केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात उघडकीस आली. चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच कथेने असे ‘प्रेमळ ’वळण घेतल्यामुळे निर्मात्यासह सर्वच चिंतेत पडले आहेत. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी रात्री दिग्दर्शक आशीष अशोक बन्सोडे (रा. अशोकनगर, माजलगाव) याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.बन्सोडे हा माजलगावातील अशोक नगरात नृत्यशिक्षणाचे वर्ग घेतो. येथील शिवाजी नगरात राहणारी १६ वर्षीय मुलगी त्यांच्याकडे शिकत होती. दरम्यान, बन्सोडे याने अनाथ मुलांच्या जीवनावर ‘अनाथवन’ नावाचा चित्रपट काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने नृत्य शिकणाऱ्या मुला- मुलींनाच चित्रपटात भूमिका दिल्या. चित्रीकरणाचे कामही सुरू झाले. त्यासाठी दोन दिवसांपासून तो कलावंतांसह बीडमधील साठे चौकातील एका लॉजमध्ये राहात होता. मंगळवारी बीडजवळील बिंदुसरा प्रकल्प व शिंदेनगरात चित्रीकरण करण्यात आले. मात्र बुधवारी अचानक या कलावंतांपैकी एका १६ वर्षीय मुलीला घेऊन बन्सोडेने पळ काढला. दोघांचेही मोबाइल बंद होते. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बन्सोडेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. (प्रतिनिधी)>दोन बायकांचा दादलाबन्सोडे हा दोन बायकांचा दादला असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. पहिल्या बायकोपासून त्याला एक मुलगा, एक मुलगी आणि दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अल्पवयीन नटीसह दिग्दर्शक पळाला
By admin | Published: August 26, 2016 4:30 AM