शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लॉकडाऊन काळात रस्त्यावर अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांना आपत्ती सेवा पदक देऊन गौरविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 3:38 PM

राज्यातील सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे.

ठळक मुद्देआवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस महासंचालकांना दिले आदेशराज्यात आतापर्यंत १३८८ हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण सुमारे २० पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागले मृत्युला

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरुन काम करणार्‍या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आपत्ती सेवा पदक देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.राज्यात मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला आहे. त्यात संचारबंदीची अंमलबजावणी करताना व लोकांनी घरात रहावे म्हणून पोलीस अहोरात्र रस्त्यावर उतरुन बंदोबस्त करीत आहेत. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून सामाजिक बांधिलकी कायम ठेवण्याचे अभुतपूर्व काम या काळात पोलीस करीत आहेत. हे करीत असताना राज्यात आतापर्यंत १३८८ हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सुमारे २० पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना मृत्युला सामोरे जावे लागले आहे.लॉकडाऊन अचानक जाहीर झाल्याने लाखो मजूर, कामगार आपल्या गावी जाऊ शकले नाही. व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली़, अशा लाखो लोकांना पोलिसांनी या काळात मोठ्या प्रमाणावर मदत करुन त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय केली. आजपर्यंतच्या पोलिसांच्या इतिहासात इतके मोठे सामाजिक कार्य पोलिसांकडून प्रथमच होत आहे.केंद्र सरकारने कामगारांना घरी जाण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांची यादीबनवून त्यांची प्रत्यक्ष विशेष श्रमिक रेल्वेगाड्या तसेच एसटी बसद्वारे त्यांच्या गावी रवाना करण्याची मोठा शिस्तबद्ध कार्यक्रम राज्यातील पोलिसांनी राबविला आहे. अजूनही त्याची कार्यवाही सुरु आहे.राज्यातील सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे. अशा सर्वांचे कौतुक, प्रोत्साहन करण्याकरीता त्यांना गृहविभागातर्फे आपत्ती सेवा पदक अथवा तत्सम पदक देऊन त्यांचा गौरवकरण्याकरीता सविस्तर प्रस्ताव सादर करावा असा आदेश गृहमंत्री अनिल देशमुखयांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखState Governmentराज्य सरकार