शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

परीक्षेपूर्वीच उत्तरे व्हायरल? बारावी गणिताच्या सेक्शन ‘ए’चे प्रश्न फुटल्याची चर्चा : बाेर्डाचा स्पष्ट नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 05:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शनिवारचा बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेच्या काही वेळापूर्वी माेबाइलवर व्हायरल झाल्याच्या चर्चेने पुन्हा यंत्रणेच्या दक्षतेवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारचा बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेच्या काही वेळापूर्वी माेबाइलवर व्हायरल झाल्याच्या चर्चेने पुन्हा यंत्रणेच्या दक्षतेवर प्रश्न निर्माण केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिकेतील सेक्शन ‘ए’चे प्रश्न पेपर सुरू हाेण्यापूर्वी व्हायरल झाले. त्यामुळे शहरातील बऱ्याच केंद्रांबाहेर यावरून संशयास्पद हालचाली झाल्याची चर्चा आहे. मात्र, विभागीय मंडळाने अशाप्रकारे प्रश्नपत्रिका व्हायरल हाेण्याच्या माहितीबाबत स्पष्ट नकार दिला आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजतापासून पेपर सुरू हाेणार हाेता. नागपूर शहरातील काही केंद्रांवर सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गणिताची प्रश्नपत्रिका माेबाइलवर मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ही प्रश्नपत्रिका ग्रामीण भागातील एखाद्या केंद्रावरून व्हायरल झाली असल्याचे बाेलले जात आहे. सेक्शन ‘ए’च्या आठ प्रश्नांसाठी १६ गुण आहेत. हाच भाग व्हायरल करण्यात आल्याचे बाेलले जात आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या उत्तरांचे पर्याय असलेला कागदही माेबाइलवर फिरत हाेता. पण, तोपर्यंत विद्यार्थी परीक्षेसाठी आत गेले होते. पेपर फुटल्याची शक्यता बाेर्डाच्या अधिकाऱ्यांनी धुडकावून लावली.

यवतमाळ : मुख्य आरोपीला अटकमहागाव (जि. यवतमाळ) : तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालय परीक्षा केंद्रावरून दहावीचा मराठीचा पेपर शुक्रवारी व्हायरल केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक श्याम तास्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना केंद्र संचालक पदावरून तत्काळ हटवण्यात आले. पोलिसांनी अमोल बळीराम राठोड (रा. कोठारी, ता. महागाव) याला ताब्यात घेतले आहे. २१ फेब्रुवारीला तो केंद्रावर आला असताना नजर चुकवून त्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

जालना : उत्तरे व्हायरल, तिघांना पोलिस कोठडीबदनापूर (जि. जालना) : दहावीच्या परीक्षा केंद्रावर शुक्रवारी मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे व्हायरल केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी बदनापूर पोलिसांत २१ फेब्रुवारीला रात्री उशिरा गुन्हा दाखल  झाला. पोलिसांकडून अविनाश भगवान अंभोरे (२९), कृष्णा अशोक सिरसाट (२३), अजय संजय निकाळजे (२३) यांना अटक करण्यात आली आहे.

भंडारा : केंद्र संचालक, पर्यवेक्षकावर कारवाईभंडारा :   एकोडी (ता.साकोली) येथे बारावीच्या केंद्रावर शनिवारी विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले.त्याला परीक्षेतून निलंबित केले असून केंद्र संचालक, पर्यवेक्षकांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस केली. ही कारवाई स्व. निर्धनराव पाटील वाघाये  महाविद्यालयाच्या केंद्रावर झाली आहे.

छ. संभाजीनगर :  विद्यालय कारवाईच्या कचाट्यातफुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयाच्या बारावीच्या परीक्षा केंद्रास शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी भेट दिली असता येथे सामूहिक कॉपी आढळली.त्यामुळे येथील संस्थेची मान्यता रद्द करण्याचा तसेच उपस्थित केंद्र प्रमुखांसह अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. येथे भौतिकशास्त्राच्या पेपरच्या वेळीही कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती. 

टॅग्स :examपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा