शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

मुंबईत नव्हे, आता ग्रामसभेतच चर्चा

By admin | Published: June 05, 2017 5:04 AM

किसान क्रांती कोअर कमिटीचा धिक्कार करीत यापुढे सरकारशी कुठलीही चर्चा होणार नाही़ सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करायची असेल

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर/पुणतांबा : किसान क्रांती कोअर कमिटीचा धिक्कार करीत यापुढे सरकारशी कुठलीही चर्चा होणार नाही़ सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करायची असेल, तर त्यांनी ग्रामसभेत खुली चर्चा करावी, असा इशारा देत पुणतांबा ग्रामस्थांनी सोमवारी महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे़ शेतकऱ्यांनी रविवारी अकोले, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंद्यासह नगर- सोलापूर मार्गांवर रास्ता रोको करीत दूध व भाजीपाला रस्त्यावर फेकला. जिल्ह्यातील सर्वच आठवडे बाजार बंद होते. शेतकऱ्यांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू होताच संपाच्या चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या पुणतांबा ग्रामस्थांनी एकत्र येऊन संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे़ संपाची सूत्रे नामदेव धनवटे, डॉ़ धनंजय धनवटे, बाळासाहेब चहाण, विजय धनवटे यांनी हाती घेतली आहेत़ गावासह जिल्ह्यातील इतर शेतकरी एकत्रित संपाची दिशा ठरवतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला़ रविवारी ग्रामस्थांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला. आंदोलनात नगर जिल्हा व उस्मानाबादचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़किसान क्रांती समन्वय समितीने जाहीर केल्याप्रमाणे संप पुढे सुरूच ठेवण्यावर जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत़ कोअर कमिटी विसर्जित होण्याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे. कोअर कमिटीचे सदस्य जयाजी सूर्यवंशी यांचे ठिकठिकाणी पुतळे जाळण्यात आले. रविवारी दिवसभर गावोगावी संपाबाबत नियोजन बैठका सुरू होत्या. त्यामुळे सोमवारचा संप तीव्र असण्याची शक्यता आहे.