नाशिक : राज्यात आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात जरांगे पाटील आणि हाके यांच्याशी शासनातर्फे चर्चा झाली असून मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत त्यावर नक्कीच सकारात्मक चर्चा होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौऱ्यात दिले. विधान परिषद निवडणूक प्रचारासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यात झालेला विलंब आम्हाला भोवल्याची कबुली त्यांनी प्रथमच दिली तसेच विरोधकांनी पसरवलेले गैरसमज खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरल्याने काही ठिकाणी फटका बसल्याचेही ते म्हणाले. मात्र असा गैरसमज पसरवणारा खोटा प्रचार करूनही विरोधकांना सत्ता मिळालीच नाही. त्यामुळे जनता कामालाच प्राधान्य देते खोट्या प्रचाराला नाही हे सिद्ध झाले. आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात नेहमीच पुढे असतो शिक्षकांसाठी दिलेले आश्वासन आचारसंहिता संपल्यानंतर पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आमचे सरकार सकारात्मक असून लवकरच काही निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यानंतर शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्यानिवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे तदर्शन घेऊन वारकऱ्यांची ही त्यांनी संवाद साधला.