पिंपरी : निवडणुकीची रणधुमाळी बुधवारी मतदान होताच थांबली. रोज कोपरा सभा, बैठका, भेटीगाठी यामध्ये व्यस्त असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते थोडे निवांत झाले असून, 19 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. ठिकठिकाणच्या गप्पांमध्ये आमदार कोण होणार, कोण दुस:या क्रमांकावर राहणार याचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. राज्याचे चित्र काय असेल, कोणाला बहुमत मिळेल, या चर्चाना उधाण आले आहे.
कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारणार, कोणाला किती मते मिळतील, निवडून येणारा किती फरकाने येईल, निवडून येणा:यास कोणते फॅक्टर कामास येतील. पराभूत होणारा कशामुळे पराभूत होईल. कोणाला कोणत्या भागात किती मते मिळतील असे अंदाज, आडाखे बांधले जात आहेत. एवढेच नव्हे, तर त्यावर पैजाही लावल्या जात आहेत. चौक, कट्टे, हॉटेल या ठिकाणी ओळखीचे तीन-चार जण
एकत्रित येताच, त्यांच्यात
निवडणुकीची काय परिस्थिती असेल, याबाबतचीच चर्चा होत आहे. ‘एक्ङिाट पोल’च्या अंदाजावर चर्चा, तर्क-वितर्क लढवले जात आहेत. (प्रतिनिधी)
उमेदवार नॉट रिचेबल,
मोबाईल स्विच ऑफ
4मतदानाच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणार्पयत मोबाईलवर मतदारांशी संपर्क साधणारे, कार्यकत्र्याशी बोलण्यात व्यस्त असलेल्या उमेदवार कार्यकत्र्याचे मोबाईल मतदानाच्या दुस:या दिवशीच स्विच ऑफ झाले. रात्रंदिवस एक करून प्रचारात व्यस्त राहिलेले उमेदवारसुद्धा ‘नॉट रिचेबल’ झाले. बुधवार्पयतची मतदारांच्या संपर्कासाठी सक्षम यंत्रणा गुरूवारी थंड पडली. निवडून आल्यानंतर 24 तास आपल्या सेवेत राहू असे आश्वासन देणारे उमेदवार 24 तासांच्या आत नॉट रिचेबल झाले.
उमेदवार ‘आउट ऑफ स्टेशन’
4उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नापासून ते निवडणूक प्रक्रिया जाहिर होऊन मतदान होण्याच्या दिवसार्पयत जीवाचे रान केलेल्या उमेदवारांनी निवडणुकीच्या चर्चेच्या वातावरणातून काही काळ बाहेर राहण्याच्या उद्देशाने आउट ऑफ स्टेशन जाणो पसंत केले आहे. ताण-तणाव, तसेच चिंता, उलघाल अशी त्यांच्या मनाची अवस्था झाली आहे. उमेदवारांचे निकटवर्तीय कार्यकर्तेही कामाचा थकवा घालविण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत.
निवडणूक कर्मचारी वैतागले
4निवडणूक कामकाजासाठी नेमणूक केलेले कर्मचारी, अधिकारीसुद्धा वैतागले आहेत. कधी एकदा निवडणूक कामकाजातून सुटका होते, अशी त्यांच्या मनाची अवस्था आहे. मतदानाचा दिवस झाला. मतदान यंत्र मतमोजणीच्या ठिकाणी हलविण्यात आली. मतमोजणीस तीन दिवस उरले असल्याने त्यांच्यातील काहींना थोडी उसंत मिळाली आहे.