पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी आर्किटेक्चर कालेजच्या युनिव्हर्सल डिझाईन सेंटरतर्फे दिव्यांगांना सहजतेने जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या ‘सुगम्य भारत’ अभियानांतर्गत दि. २ ते ४ मार्च या कालावधीत आर्किटेक्ट कॉलेजमध्ये हे चर्चासत्र घेण्यात आले आहे.पुण्यातील विविध वास्तुशास्त्र महाविद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थ्यांना ‘दिव्यांगांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना’ याबाबतचे प्रशिक्षण चर्चासत्रात दिले जाईल. तसेच सर्व सरकारी, सार्वजनिक तसेच ऐतिहासिक वास्तूंमध्ये दिव्यांगांना विनाअडथळा वावरता आले पाहिजे, या संदर्भातील मार्गदर्शन केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या कार्यक्रमानुसार ऐतिहासिक, पौराणिक अशा ८० वास्तूंचे दिव्यांग सुविधांसाठी केलेले संशोधन प्रा. कविता मुरूगकर चर्चासत्रात सादर करणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रात देशातील विविध तज्ज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ, केंद्र शासनाच्या ऐतिहासिक वास्तुसंवर्धन विभागाचे अधिकारी, दिव्यांगांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच दिव्यांग व्यक्ती सहभाग घेणार आहेत. चर्चासत्राच्या शेवटच्या दिवशी दिवांगांविषयी जागरूकता निर्माण करणारा ‘मुक्ति’संगीत चमूूचा हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. प्राचार्या डॉ. अनुराग कश्यप आणि प्रा. कविता मुरूगकर यांनी चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
दिव्यांगांविषयी आज संशोधनपर चर्चासत्र
By admin | Published: March 02, 2017 12:56 AM