शेतीचा डॉक्टर : या काळात सोयाबीनवर विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याची उपयायोजना अशी करा :
१. मूळकूज: या रोगामुळे सोयाबीनची मुळे सडतात. झाडे वाळतात. उपाय : कार्बोेक्सीन थायरम (मिश्र घटक) २ ग्रॅम पाण्यात मिसळून फवारणी करावी. खड्ड्यातील झाडावर बुरशीनाशक द्रावण टाकावे. संक्रमण टाळण्यासाठी हिरव्या झाडांवर द्रावण टाकणे आवश्यक आहे. बुरशी लागलेली झाडे उपटून शेतीबाहेर नेऊन नायनाट करावा. ही बुरशी झाडाच्या आश्रयाने जिवंत राहून दुसऱ्या वर्षी पुन्हा अपायकारक ठरते.
२. कॉलर रॉट : सोयाबीनच्या झाडांना वेटोेळे घालतात. त्यामुळे झाडे कोमेजतात. उपाय : वरीलप्रमाणेच उपाय करावेत.
३. शेंगा करपणे : झाडावर डाग पडतात. झाडे मरतात. उपाय : टेबुकोनोझोल १ मिली प्रतिलिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. खड्ड्यातील झाडावर बुरशीनाशक द्रावण टाकावे. पुढच्या वर्षी पिकांची फेरपालट करावी. तृणवर्गीय पिकांची पेरणी करावी.