शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
3
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
4
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
5
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
6
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
7
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
9
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
12
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
13
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
14
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
15
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
16
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
17
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
18
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
19
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
20
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."

दिशा कायदा होणार नागपूर अधिवेशनात; अनिल देशमुख यांचे बैठकीत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 3:29 AM

महिलांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांसंदर्भात विविध पक्षसंघटनांच्या महिला नेत्यांची बैठक अनिल देशमुख यांनी घेतली.

मुंबई : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायद्यासंबंधीचे विधेयक विधिमंडळाच्या आगामी नागपूर अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी एका बैठकीत दिले.महिलांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांसंदर्भात विविध पक्षसंघटनांच्या महिला नेत्यांची बैठक अनिल देशमुख यांनी घेतली. दिशा कायदा व्हावा, यासाठी सर्वात आधी महाविकास आघाडी सरकारनेच पुढाकार घेतला होता, त्यासाठी आपण स्वत: आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी हैदराबादला गेलो होतो. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी अश्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. त्याचे सादरीकरण मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्य मंत्रिमंडळाची एक उपसमितीही या संदर्भात नेमण्यात आली आहे. कोरोनामुळे या संदर्भातील कार्यवाही होऊ शकली नाही. मात्र, आगामी नागपूर अधिवेशनात या कायद्याचे विधेयक मांडून ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल आणि त्याला सर्वपक्षीय पाठिंबा नक्कीच राहील, असे देशमुख यांनी बैठकीत सांगितले.या बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आ.मनिषा कायंदे, आ.यामिनी जाधव, मीना कांबळी, सरोज राव, नीला लिमये, ज्योती ठाकरे, रूपाली चाकणकर यांनी विविध सूचना केल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सतेज पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख