शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा- नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 7:54 PM

'शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र बंद करु'

मुंबई:देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरणच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आखले असून शेतकरी संपवण्याचे पाप केले जात आहे. बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची ही संतापजनक घटना तालिबानी प्रवृत्तीचे निदर्शक असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ व शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, किसान काँग्रेसचे श्याम पांडे, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद आदी उपस्थित होते.

आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, शेतकरी हा या देशाचा आधार आहे. अन्नदाता आहे, त्यालाच संपवण्याचे काम भाजप करत आहे. लखीमखेरी येथे झालेल्या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र बंद करु इशाराही पटोले यांनी दिला.  काँग्रेस नेत्या व सरचिटणीस प्रियंका गांधी लखीमखेरी येथील पीडित शेतकरी कुटुंबाला भेटण्यासठी जात असताना त्यांची अडवणूक केली, त्यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले आणि शेवटी बेकायदेशीर अटकही केली. या सर्व घटनांचा निषेध करुन प्रियंका गांधी यांना सोडा नाहीतर राज्यभर जेलभरो आंदोलन करु असेही पटोले म्हणाले. भाजपा सरकार सातत्याने शेतकऱ्यावर अन्याय करत असून महाराष्ट्रातही शेतकरी संकटात असताना मदत देण्यात दुजाभाव केला जात आहे. त्यावरही भाजपा राजकारण करत आहे. या सर्वांचा हिशोब भाजपाला द्यावा लागेल.  

लखिमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडणाऱ्या आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे आंदोलन करण्यात आले. तर जळगाव येथे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तसेच लातूर, सोलापूरसह राज्यभर सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी भाजपा व उत्तर प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करुन निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा व उत्तर प्रदेशातील अजयसिंह बिष्ट सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेचा निषेधही करण्यात आला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश