नागपूर : ठाणे मनपा क्लस्टर संदर्भातील लक्षवेधीवर सर्वपक्षीय सदस्यांची एकजूट गुरुवारी पाहायला मिळाली. राज्यमंत्र्यांच्या उत्तरावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसह भाजप सदस्यांनीही असमाधान व्यक्त करीत लक्षवेधी राखून ठेवण्याची मागणी केली. सर्वपक्षीय सदस्यांची तीव्र भावना लक्षत घेता सरकारला लक्षवेधी राखून ठेवावी लागली. राज्यमंत्री रणजित पाटील यांनी यावर उत्तर देत सातत्याने सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु सदस्यांच्या तीव्र विरोधापुढे त्यांचे काही चालले नाही.शिवसेनेचे प्रताप सरनाईक व इतर सदस्यांनी सादर केलेल्या ठाणे महापालिकेंतर्गत क्लस्टर विकासाचा प्रश्न उपस्थित करीत यात कोळीवडे व गावठाण यांचा समावेश करण्यात येऊ नये, त्यांना झोपडपट्टी समजू नये, अशी मागणी लावून धरली. येथील लोक या ठिकाणी तेव्हापासून रहात आहेत, जेव्हा शहरही वसले नव्हते, असे त्यांचे म्हणणे . यावर उत्तर देताना रणजित पाटील यांनी सांगितले की, झोपड्यांना संरक्षण दिले जाईल. याबबत तकार व सूचना मागविण्यात आल्या आहेत. ‘हायपॉवर कमिटी’ यावर निर्णय घेईल.
राज्यमंत्र्यांच्या उत्तराने सदस्यांचे असमाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 4:16 AM