शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
3
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
4
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
6
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
8
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
9
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
10
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
11
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
12
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
13
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
14
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
16
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
17
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
18
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
19
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
20
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर

राज्य शिक्षण मंडळांचे सदस्यत्व बरखास्त

By admin | Published: March 11, 2015 11:53 PM

आदेश जारी : ऐन परीक्षेच्या काळात निर्णय

टेंभ्ये : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांवरील सर्व सदस्यांचे सदस्यत्व बरखास्त करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या ५ मार्चच्या निर्णयानुसार बुधवारी याबाबतचे आदेश मंडळांनी आपल्या सदस्यांना दिले. ऐन परीक्षेच्या काळात या बरखास्तीमुळे कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची नऊ विभागीय मंडळे व राज्य मंडळावर आघाडी सरकारच्या काळामध्ये सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. निवडणुकीपूर्वी या नियुक्त्यांचे राजपत्रदेखील प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार सर्व विभागीय मंडळे व राज्य मंडळावरील सदस्यांनी कामकाज सुरू केले होते. सप्टेंबर/आॅक्टोबर २०१४ च्या परीक्षेदरम्यान राजपत्र प्रसिद्ध न झाल्याने यातील काही मंडळ सदस्यांना सहभाग घेता आला नव्हता. सध्या सुरू असणाऱ्या फेब्रुवारी/मार्च २०१५ च्या परीक्षेमध्ये प्रत्यक्षात त्यांचा सहभाग घेतला होता. त्यांना स्वतंत्र परीक्षा केंद्रांना भेटीचे नियोजनही करून दिले.शिक्षण मंडळांकडून परीक्षांचे परिपूर्ण नियोजन केले असताना परीक्षा पूर्ण होण्यापूर्वीच सर्व विभागीय मंडळांवरील व राज्य मंडळावरील सदस्यांची नियुक्ती रद्द केल्याचे राजपत्र राज्य शासनाने दि. ५ मार्चला प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार राज्य मंडळाने सर्व विभागीय मंडळांना सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले . प्रत्यक्षात १९ मार्चला मंडळ सदस्यांना केंद्र भेटीचे नियोजन दिले असतानाही बुधवारपासून त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याचे आदेश विभागीय मंडळांनी मंडळ सदस्यांना दिले आहेत.शिक्षण मंडळामध्ये चांगले व नावीन्यपूर्ण बदल करण्याच्या दृष्टीने ही मंडळे महत्त्वाची भूमिका बजावतात. शासनाने ऐन परीक्षेच्या काळात घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयाबाबत शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चा आहे. (वार्ताहर)राजकीय प्रभावराजकीय वर्चस्वाच्या प्रभावाखाली या नियुक्त्या रद्द केल्या जातात किंवा नव्याने नियुक्त्या दिल्या जातात. अन्य महामंडळांप्रमाणे शिक्षण मंडळासाठी राज्य शासनाला कोणतीही विशेष तरतूद करावी लागत नाही. त्यामुळे अन्य मंडळांप्रमाणे ही मंडळे बरखास्त न करता नियुक्तीनंतर कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरच मंडळांमध्ये बदल करावेत, अशी अपेक्षा पुढे येत आहे.